चला मतदान करायला ....
''अभिरूप मतदान करून स्वच्छता मंत्री निवड''
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक इयत्ता ७वी
सन २०१९ मतदानाचे वर्ष! लोकसभा व विधानसभा निवडणुकीची कार्यवाही कशा प्रकारे केली जाते. याची विद्यार्थ्यांना
माहिती मिळावी,एक सुजाण नागरिक निर्माण व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन दि.२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त
१ ऑक्टोबर रोजी उपक्रम घेण्यात आला.वर्गात मतदान कक्ष तयार करून ४ मतदान अधिकारी ,लोकप्रतिनिधीची निवड केली गेली.प्रत्येक विद्यार्थ्यांने गुप्त मतदान करून योग्य प्रतिनिधीची निवड केली.मतदान अधिकाऱ्यांनी उत्तम प्रकारे मतमोजणी करून निर्णय घोषित केला.निवड झालेल्या उमेदवाराला उचलून सर्वानी आनंद व्यक्त केला.तसेच शाळा,वर्ग,परिसर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा घेऊन हक्क व कर्तव्य,याची जाणीव घेतली,मतदान प्रणाली प्रात्यक्षिक कार्याने मुलांना छान समजली या उपक्रमास वर्गशिक्षिका सौ.नयना पाटीलबाई व मा.मुख्याध्यपिका सौ.चौधरीबाई यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
'' माझे मत माझा अधिकार ,मतदान करा महाराष्ट्र घडवा''..!