स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथ.डोंबिवली पूर्व.शाळेत ५ सप्टेंबर रोजी आभासी प्रणालीद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन करून शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Source :    Date :07-Sep-2021

shikshakdin_1   
                                                                                       शिक्षक दिन
"गुरुविण मिळेना ज्ञान,
ज्ञानावि न होई जगी सन्मान,
जीवन भवसागर तराया,
चला वंदू गुरुराया ||'
         भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.१९६२ मध्ये डॉक्टर राधाकृष्णन यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिन हा शिक्षकांचा गौरव दिन साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती.देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले तेव्हापासून ही परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्यातही अशीच सुरू राहील.५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आमच्या शाळेत ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या ,त्या पुढील प्रमाणे
इ.१ली व २री-निबंध स्पर्धा
'माझा आवडता शिक्षक'
इ.३री व ४थी- वक्तृत्व स्पर्धा
१)माझा आवडता शिक्षक
. २)मी शिक्षक झालो तर...
इ.५वी-निबंध स्पर्धा
१) माझे आवडते शिक्षक
२) शिक्षक दिन
वक्तृत्व स्पर्धा-मी शिक्षक झालो तर
इ.६वी ७वी-निबंध लेखन स्पर्धा
१) माझ्या जीवनातील
शिक्षकाचे स्थान
२) कोव्हीड काळातील
शिक्षकाची भूमिका
काव्यलेखन व गायन स्पर्धा -
माझा शिक्षक माझा प्रेरक.
          विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधाचे फोटो वकृत्व, काव्य गायना चे व्हिडिओआपआपल्या वर्ग शिक्षकांना व्हाट्सअप वर पाठवले. त्यातील काही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.५ सप्टेंबर 'शिक्षक दिनाचे' औचित्य साधून शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी दिनांक ५ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२१ या काळात 'आवर्तन ध्यान''Stess Management With Cyclic Meditation'या 'Google Meet' वरील ऑनलाईन शिबिराचे आयोजन करण्यात आले.सदर शिबिरास शाळेचे योग शिक्षक श्री एकनाथ पवार सर यांनी मार्गदर्शन केले सर्वांनी या कृतीयुक्त माहितीपूर्ण शिबीराचा लाभ घेतला शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ. गितांजली मुणगेकरबाई यांचे सुयोग्य नियोजन तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन,पालकांचे सहकार्य,विद्यार्थ्यांचा उस्फूर्त सहभाग यामुळे ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचा उपक्रम आमच्या शाळेत यशस्वीरित्या संपन्न झाला.
 

shikshakdin_2  
shikshakdin_3  
shikshakdin_4  
shikshakdin_5  
shikshakdin_6  
shikshakdin_9  
shikshakdin_8  
shikshakdin_7  
 

shikshakdin_4  
shikshakdin_3  
shikshakdin_2  
shikshakdin_1