रा.शि.संस्था.संचालित स्वा.वि.वि.दत्तनगर प्राथ.डोंबिवली पूर्व.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शाळा बंद असल्यातरी 8ऑगस्ट रोजी दीपअमावस्या आपापल्या घरी राहून ऑनलाईन पद्धतीने उत्साहाने साजरी केली.
Source : Date :09-Aug-2021
दीपअमावस्या...!!
भारतीय संस्कृतीत अग्नीला खूप महत्त्वाचे स्थान आहे.खरं तर सर्वच धर्मांमध्ये अग्नी तत्वाला विशेष महत्त्व आहे.पंचमहाभूतांपैकी एक महत्वाचे तत्व म्हणजेच अग्नी!आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा व ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा यासाठी आजच्या दिवशी दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते.आषाढ महिन्यातील ही अमावस्या 'दीपअमावस्या' म्हणूनही ओळखली जाते.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,दत्तनगर प्राथमिक शाळेच्या इ.१ली ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी शाळा बंद असल्याने,आपल्या घरीच दीपअमावस्या साजरी केली.आपापल्या घरात विविध प्रकारचे दिवे प्रज्वलित करून त्यांची मनोभावे पूजा केली.तसेच 'शुभम करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा... !',ॐसूर्यो ज्योतिर् ज्योति:सूर्य:स्वाहाllइ.श्लोकांचे पठण केले.आभासी प्रणालीद्वारे शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना दीपअमावस्येचे महत्त्व सांगितले.
शाळा बंद असली तरीही हा उपक्रम पालकांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न झाला.शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.गितांजली मुणगेकर,शाळा समितीच्या मा.अध्यक्षा डॉ.सौ.सरोज कुलकर्णी तसेच इतर सर्व मान्यवर पदाधिकारी यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.