स्वा.वि.वि.दत्तनगर प्रा.शाळेच्या इ.१ली ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाला पूरक राख्या तयार करून डॉक्टर्स,परिचारिका,सफाई कामगार व सुरक्षा कर्मचारी यांना राख्या बांधून त्यांच्याप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.
Source : Date :24-Aug-2021
राखी बांधून हातात बहीण ओवाळते भावाला......
भरून साखर तोंडात जीव लावेल भावाला...
राखी पौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा.
सण- उत्सवांचं लेण लाभलेली संस्कृती म्हणजे आपली भारतीय संस्कृती.रक्षाबंधन अर्थात भावा- बहिणीच्या नि:स्वार्थ प्रेमाच्या नात्याचा हा सण.स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,दत्तनगर प्राथमिक शाळेच्या इ.१ली ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाला पूरक अशा राख्या घरीच तयार केल्या व covid-19 च्या काळात अहोरात्र झटून सर्व भारतवासीयांसाठी कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्स,परिचारिका,सफाई कामगार व सुरक्षा कर्मचारी यांना राख्या बांधून त्यांच्याप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.
त्याचप्रमाणे वृक्षांचे महत्त्व लक्षात घेता त्यांच्याही प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी झाडाझुडपांना देखील राखी बांधून रक्षाबंधनाचा हा सण साजरा केला.शाळा बंद असली तरीही हा उपक्रम पालकांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न झाला.आमच्या शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.गितांजली मुणगेकर,शाळा समितीच्या मा.अध्यक्षा डॉ.सौ.सरोज कुलकर्णी तसेच इतर सर्व मान्यवर पदाधिकारी यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.