स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वा.वि.वि.दत्तनगर प्रा.डोंबिवली पू.शाळेत विविध ऑनलाईन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Source :    Date :15-Aug-2021
 
swatantr din_1  
राष्ट्रीय शिक्षण संस्था
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली (पूर्व)
  उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला
       नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
        ज्यांनी भारत देश घडविला ||
               १५ ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस आहे कारण ब्रिटिश साम्रज्यापासून दि.१५ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.भारत स्वतंत्र्य झाला पण हे स्वातंत्र्य इतक्या सहजपणे मिळाले नाही. स्वातंत्र्यासाठी अनेक शूर वीरांना,महान नेत्यांना तसेच स्वातंत्र्य सैनिकांना संघर्ष करावा लागला.या दिवशी सर्वजण ध्वजारोहण करून ध्वजाला वंदन करतात. भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकवून देशाला संबोधित करतात.सर्व शाळा, महाविद्यालये,कार्यालये यामध्येही ध्वजवंदन केले जाते.आजचा हा दिवस आनंदाचा,उत्साहाचा,वीरांच्या बलिदानाच्या आठवणी जपण्याचा,तुमचा,आमचा, सर्वांचा…कोरोनामुळे आपण घरी आहोत,आपली शाळा बंद आहे.ज्याप्रमाणे पारतंत्र्याचा अंधार दूर सारून स्वातंत्र्याचा सूर्य उगवला त्याप्रमाणे कोरोनाचे संकट दूर झाल्यावर आपण पुन्हा नक्की एकत्र येऊ.आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण झाली.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेतील विद्यार्थ्यांनी हा स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला. यावर्षी कोरोना महामारी मुळे हा स्वातंत्र्याचा उत्सव ऑनलाइन साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी न्माननीय मुख्याध्यापिका सौ.गितांजली मुणगेकर बाई यांनी वर्गशिक्षकांच्या मदतीने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले.स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुढील उपक्रम घेतले गेले.
इ.१ली व २री-तिरंगा झेंड्याचे चित्र काढणे व रंगवणे.
इ.३री ते ७वी-शब्दांच्या,स्पेलिंगच्या पताका तयार करणे.
    तसेच इयत्ता ३री ते ७वी च्या वर्गातील एक -एक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केले.
                   सर्व विद्यार्थ्यांनी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या घरातूनच देशभक्ती गीत गाऊन स्वातंत्र्यदिन साजरा केला.विद्यार्थ्यांनी सदर गीताच्या व्हिडीओ क्लिप्स, चित्रांचे आणि पताकाचे फोटो WhatsApp च्या माध्यमातून वर्गशिक्षकांना पाठवल्या. यातील निवडक विद्यार्थ्यांचे चित्र व व्हिडीओ क्लिप्स एकत्र करून प्रक्षेपित करण्याचे काम श्री.मयूर राऊत सर यांनी केले.अहवाल लेखन व छायाचित्रे चित्रफितीचे संकलन सहाय्यक शिक्षिका सौ.वर्षा खाडे यांनी केले.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी मोठ्या जोशात घोषवाक्ये म्हटली.त्या व्हिडिओचे संकलन श्री.पवार सर यांनी केले.
               भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आमच्या शाळेतील सन्माननीय मुख्याध्यापिका,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि निवडक विद्यार्थी यांनी संपूर्ण राष्ट्रगीताचे गायन करून उत्तम सादरीकरण केले.केंद्र सरकारतर्फे आयोजित आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ऑनलाइन राष्ट्रगीत गायन स्पर्धेत आमच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीतील ४५ विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी सहभाग घेतला.त्यांना सहभागाचे ई- प्रमाणपत्र ही मिळाले.
            सदर कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक शालेय समितीच्या सन्माननीय अध्यक्षा आणि सदस्यांनी केले.सन्माननीय मुख्याध्यापिका यांचे मार्गदर्शन,सर्व शिक्षकांचे परिश्रम,पालकांचे सहकार्य व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.
 
 

swatantr din_4  
swatantr din_3  
swatantr din_2  
swatantr din_1   
 

swatantr _1  H
swatantr _4  H
swatantr _3  H
swatantr _2  H  
 

swatantrdin_5  
swatantrdin_4  
swatantrdin_3  
swatantrdin_2  
swatantrdin_1   
 

15 ogast_6  H x
15 ogast_5  H x
15 ogast_4  H x
15 ogast_3  H x
15 ogast_2  H x
15 ogast_1  H x 
 

cirteficat_2  H
cirteficat_1  H 

cirteficat_4  H
cirteficat_3  H
cirteficat_2  H
cirteficat_1  H