स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथ.डोंबिवली पूर्व.२३जुलै २०२१रोजी आभासी प्रणालीव्दारे"गुरुपौर्णिमा,लो.टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
Source : Date :23-Jul-2021
राष्ट्रीय शिक्षण संस्था
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथ. डोंबिवली पूर्व.
“प्रेरक:सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा
शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरव:स्मृत :"
प्रेरक,सूचक,सत्यवाचक,मार्गदर्शक,शिक्षक आणि बोधक यांचा सम्मुच्चय म्हणजे गुरू.या सर्व रूपांत एक गुरू आपल्या शिष्यास अंधाराकडून प्रकाशाकडे अभिप्रेरित करीत असतो.
गुरूंचे व त्याचप्रमाणे‘महाभारतासारखे’ महान खंडकाव्य रचणाऱ्या ऋषी व्यासांचे पुण्यस्मरण करण्याचा दिवस म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमा यास व्यासपौर्णिमा,गुरुपौर्णिमा असेही म्हटले जाते.गुरूंचा आशीर्वाद मिळवणे,कृपादृष्टी संपादन करणे,त्यांच्या सहाय्याने आपले इप्सित साध्य करणे व असे करीत असताना मनात गुरूंचे स्मरण ठेवणे व त्याच बरोबर गुरूंचा वारसा पुढे चालवणे हे गुरुपौर्णिमा’ साजरी करण्यामागील प्रमुख उद्देश आहेत.गुरुपौर्णिमेचे हेच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून शुक्रवार दिनांक.२३जुलै २०२१रोजी शाळेत'गुरुपौर्णिमा'आभासी प्रणालीव्दारे साजरी करण्यात आली.यादिवशी शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.मुणगेकरबाईंनी दीपप्रज्वलन करून महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण केला.आभासीप्रणालीव्दारे विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमा परंपरा,इतिहास व महत्त्व यांविषयी माहिती देण्यात आली.गुरुपौर्णिमेनिमित्त इ.१ली ते ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. इ.१ली-मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा १ते१०
इ.२री -गणपति स्तोत्र पाठांतर स्पर्धा.
इ.३री,४थी-गुरुशिष्य गोष्टी पाठांतर स्पर्धा(पौराणिक कथा)
इ.५वी ते ७वी–गुरुशिष्य गोष्टी पाठांतर स्पर्धा (आधुनिक कथा)
इ.१ली ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या चित्रफित आपापल्या वर्गशिक्षकांना What’sApp व्दारे पाठविले.गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात इ.१ली ते ७वी च्या निवडक विद्यार्थ्यांनी कथाकथनाचे सादरीकरण केले.ऑनलाईन कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.नाईक बाई यांनी केले.तसेच सौ.पाटील बाई यांनी ‘गुरुमहिमा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
गुरुपौर्णिमा आणि लोकमान्य टिळक जयंती एकाच दिवशी असल्याचा दुग्धशर्करा योग या वर्षी जुळून आल्याचे आपल्याला पहावयास मिळाले.
इंग्रजांचे वर्चस्व असताना भारतभूमीच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वाहणारी आणि तन,मन,धन देशकार्यास अर्पण करणारी काही नररत्ने होऊन गेली.त्यांपैकी दैदिप्यमान नररत्न म्हणजे बाळ गंगाधर टिळक.आपल्या याभारतमातेच्या सुपुत्राचे स्मरण म्हणजे कर्तृत्वाचा,प्रेरणेचा अखंड स्त्रोत.त्यांच्या जीवन चरित्रातून आपल्याला नेहमीच बोध व मार्गदर्शन मिळत असते.“लोकमान्य”ही पदवी प्राप्त झालेल्या ध्येयवादी,कणखर व्यक्तिमत्त्वाची जयंती आपण २३ जुलै या दिवशी साजरी करतो.शाळेत लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली.त्या निमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मुणगेकर बाईंनी टिळकांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण केला.
टिळक जयंती निमित्त आमच्या शाळेत इ.१ली ते ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन उतारा लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत देखील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. टिळकांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारे मराठी,हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमधील उतारे लेखनासाठी देण्यात आले होते.
इ.१ली ते ५वी-उतारा लेखन(मराठी)
इ.६वी-उतारा लेखन(हिंदी)
इ.७वी-उतारा लेखन(इंग्रजी)
विद्यार्थ्यांनी उतारालेखनाचे फोटोज आपापल्या वर्गशिक्षकांना What’sAppव्दारे पाठविले.त्यातून उत्कृष्ट उतारा लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्गवारी निवड करण्यात आली.
अशा प्रकारे,शाळेत’गुरुपौर्णिमा’व 'टिळक जयंती‘उत्साहात साजरी करण्यात आली.सदर उपक्रमांच्या चित्रफिती व छायाचित्रांचे संकलन सौ.सैंदाणे बाईंनी करून दिले तसेच एकत्रित चित्रफिती तयार करणे व त्यांची लिंक तयार करून ते आंतरजालावर प्रसारित करण्याचे काम शाळेचे सहकारी शिक्षक श्री.राऊत सर यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण रितीने केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.मुणगेकर बाईंचे उत्कृष्ट पूर्वनियोजन शिक्षक,पालक यांचे परिश्रम व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग यांमुळे दोन्ही उपक्रम यशस्वीपणे पार पडले.