स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली पूर्व शाळेत 21 जून 2021 रोजी आभासी प्रणालीद्वारे साजरा झाला आंतरराष्ट्रीय योगदिन.

Source :    Date :21-Jun-2021
 
yog day_1  H x
 
 योगेन चित्तस्य पदेन वाचां |
मलं शरीरस्य च वैद्यकेन ||
योऽपाकरोत्तमं प्रवरं मुनीनां | 
पतंजलिं प्रांजलिरानतोऽस्मि ||
                 भारतीय प्राचीन संस्कृती,परंपरा यांमध्ये योगसाधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे 'योग'.योगाने विचार व कृती तसेच संयम व समाधान यांचे ऐक्य साधते  असे म्हटले जाते. Yoga provides holistic approach to health and well being.
                    'आंतरराष्ट्रीय योग दि' हा दरवर्षी 21 जून रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.भारताचे सन्माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत '21 जून'हा आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता. डिसेंबर 2015 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. 21 जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा दिवस असतो या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते या दिवशी दिवस मोठा व रात्र लहान असते म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते.                                       आताच्या कोरोना काळात योगाला विशेष महत्त्व आहे.प्रत्येकाने शक्य असेल तशी योगासने करणे आवश्यक आहे .योगसूत्राद्वारे शारीरिक,मानसिक व बौद्धिक विकास होतो.योग केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यावर्षीही कोरोनामुळे शाळा बंद असल्यातरी शिक्षण थांबलेले नाहीत.हा उपक्रम संपूर्ण आभासी प्रणालीद्वारे घेण्यात आला.योग प्रात्यक्षिकांचा सराव पूर्वतयारी शाळेचे सहशिक्षक श्री.पवार सर यांनी केले.                                                         21 जून या दिवशी शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरी मॅडम यांनी दीपप्रज्वलन करून योग महर्षी पतंजलि यांच्या प्रतिमेचे पूजन केले.शाळेच्या सहा.शिक्षिका सौ.पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.योगसूत्राचे महत्त्व सांगितले पतंजलीच्या योगसूत्रातील अष्टांग योगाची सविस्तर माहिती सांगितली.'योग'म्हणजे केवळ योगासन नव्हे असे सांगितले.माननीय मुख्याध्यापिका सौ.चौधरी बाईंनी'आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्राणायाम चे महत्व विशद केले.त्यानंतर क्रीडा शिक्षक श्री पवार सर यांनी आभासी प्रणालीद्वारे 3री ते 7वीच्या वर्गातील निवडक विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली.सुरुवातीला प्रास्ताविक पूरक हालचाली नंतर 12 सूर्यनमस्कार वेगवेगळी आसने पद्मासन  बद्धपद्मासन  वज्रासन   ताडासन   वृक्षासन भुजंगासन अशी सोप्याकडून कठिणाकडे जाणारी अशी आसने करून घेतली.त्यानंतर प्राणायाम,अनुलोम-विलोम करून घेतले.प्रत्येक आसनांचे वैशिष्ट्य व महत्त्व सांगितले अखेर अ'कार,उ'कार म'काराचे  गुंजन करण्यात आलेले सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरून व सर्व शिक्षकांनी शाळेत बसून या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.शेवटी"सर्वे भवन्तु सुखिन:... या शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.                                         सदर कार्यक्रम शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका शैलजा चौधरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व क्रीडा शिक्षक श्री.पवार सर व इतर सहकारी शिक्षक व माजी विद्यार्थिनी कुमारी अक्षता जबडे यांच्या अमूल्य सहकार्याने संपन्न झाला.
.
yog day_6  H x
yog day_5  H x
 
 
yog_1  H x W: 0
yog_2  H x W: 0
yog_3  H x W: 0
 
 
yog day_4  H x
yog day_3  H x
yog day_2  H x
yog day_1  H x