2ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती
'' हिमशिखरों से थे ऊँचे वो
वो सच्चाई की ऑंधी थे!
जिसको हमने संघर्ष सिखाया
कोई और नहीं वो गांधी थे.
ध्येय साधनेला केवळ क्षितिजांची सीमा,वीरा अमित तुझा महिमा । वरील ओळीतून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अनन्यसाधारण महात्म्यआपल्याला लक्षात येते.महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते.अहिंसात्मक,असहकार या आंदोलनांनी गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले.गांधीजींचा जन्म दिवस 2 ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला तत्त्वांनुसार जगले महात्मा गांधीजींच्या अतुलनीय कार्यामुळेच आपण त्यांना 'राष्ट्रपिता' म्हणतो.
साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती यांनी दिलेल्या 'जय जवान जय किसान'च्या मंत्राने सारा देश भारावून गेला होता साधेपणा आणि मानवतावादी दृष्टिकोन त्यांनी लोकांची मनं जिंकली.भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ते उत्तर प्रदेश सरकार मध्ये गृहमंत्री व वाहतूक मंत्री झाले.त्यानंतर ते कठोर मेहनत व आपल्या कार्यक्षमतेच्या निष्टेने स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान झाले व त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले.लालबहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता.आपले गुरू महात्मा गांधींच्या शैलीत एकदा म्हणाले कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे.महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लालबहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले.
महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या अनमोल कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून दरवर्षी प्रमाणे 2ऑक्टोबर हा दिवस महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती म्हणून साजरा करण्यात आला.या वर्षी कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी आभासी प्रणालीद्वारे 2 ऑक्टोबर निमित्त कार्यक्रम घेण्यात आला.यात इयत्ता पहिली ते सातवी साठी घराची व परिसराची स्वच्छता करणे स्वच्छते विषयी घोषवाक्य लिहिणे ही स्पर्धा घेण्यात आली.
अशाप्रकारे शाळेत गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती सांगितली.विद्यार्थ्यांनीआपले फोटो आपापल्या वर्गशिक्षकांना पाठविले त्यातील निवडक विद्यार्थ्यांचे फोटोचे संकलन अहवाल लेखनाचे काम सौ.महाजन बाई यांनी केले.