राष्ट्रीय शिक्षण संस्था
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,दत्तनगर प्राथमिक, डोंबिवली(पूर्व).
'वाचन प्रेरणा दिन'व जागतिक हस्त स्वच्छता दिन'
'वाचाल,तर वाचाल!'प्रत्येक व्यक्तीने स्वतःला वाचनाची गोडी लावून घेतली पाहिजे कारण वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते.आजूबाजूच्या जगातील माहिती समजते.आपले ज्ञान अद्ययावत होऊन आपली विचार शक्ती वाढते. आज जगातील अनेक विभूतींनी त्यांच्या वाचनाच्या छंदामुळे आपल्यापुढे स्वतःचा एक अलौकिक ठसा उमटवला आहे. त्या थोर विभूतींपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे 'मिसाईल मॅन'म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम.डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर या दिवशी असणारा जन्मदिवस संपूर्ण राज्यभर 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो.डॉक्टर कलाम नेहमी म्हणत असत की 'एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते'यंदा डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या १५ ऑक्टोबर रोजी साजरी होत असलेल्या ९० व्या जयंती चे औचित्य साधून स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,दत्तनगर प्राथमिक शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ.मुणगेकर बाईं यांनी सर्व शिक्षकांच्या सहविचाराने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रमाणे विविध उपक्रमांचे आयोजन केले.
*इयत्ता पहिली व दुसरी-पाठ्यपुस्तकाचे वाचन करणे.
*इयत्ता तिसरी व चौथी-कोणत्याही एका गोष्टीचे वाचन करणे.
*इयत्ता पाचवी ते सातवी-ऑनलान पुस्तक परीक्षण स्पर्धा.
इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी आपण केलेल्या वाचनाचे व पुस्तक परीक्षणाचे व्हिडिओ क्लिप्स व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपापल्या वर्गशिक्षकांना पाठवले.तसेच १५ ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक हस्त स्वच्छता दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून शाळेतील सर्व वर्गशिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना हस्त स्वच्छता दिनाचे महत्त्व सांगताना आपल्याला होणाऱ्या बऱ्याच आजारांचे मूळ हे आपल्या अस्वच्छ हातांमध्ये असते,अस्वच्छ हाताने अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे अनेक जीवजंतू आपल्या पोटात प्रवेश करतात आणि त्यातूनच विविध आजारांना आमंत्रण मिळते याबाबत मार्गदर्शन केले.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शास्त्रीय दृष्ट्या किमान वीस सेकंद हात कशापद्धतीने चोळून धुवावेत हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगितले.आज जगभरात उद्भवलेल्या कोरोनारुपी महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता हस्त स्वच्छता बाबत जागृती निर्माण करणे महत्त्वाचे आहे.जागतिक हस्त स्वच्छता दिनानिमित्त शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शास्त्रीय पद्धतीने हात धुतले व प्रत्येकाने स्वतःचा एक फोटो व्हाट्सअपच्या माध्यमाद्वारे आपल्या वर्गशिक्षकांना पाठवला.
उपरोक्त दोन्ही उपक्रमात इयत्ता पहिली ते सातवीच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.विद्यार्थ्यांकडून आलेल्या व्हिडिओ क्लिप्स व फोटो त्यातून काही निवडक व्हिडिओ क्लिप्स व फोटो वर्गशिक्षकांनी निवडले. या उपक्रमाचे अहवाल लेखन व फोटोंसह व्हिडीओ क्लिप्स चे संकलन शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ.श्रुती नाईक बाईं यांनी केले.अहवाल व फोटोसह व्हिडिओ क्लिप्स प्रक्षेपित करण्याचे काम शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री.मयूर राऊत सर यांनी केले.