आपणा सर्वांना माहितच आहे , की कोरोनाच्या महामारीमुळे शाळा बंद आहेत.असे असले तरीही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन उपक्रम अविरतपणे चालूच आहेत.लोकमान्य टिळकांच्या स्मृतिदिनानिमित्त राबविण्यात आलेला उपक्रम ही जणू त्याची पावतीच आहे.लोकमान्य टिळकांच्या निर्वाणाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.यंदाचे वर्ष लोकमान्य टिळकांचे स्मृतिशताब्दी वर्ष आहे.
'वंदन तुज लोकमान्य टिळक भास्करा ,
स्फूर्ती देई बालकांस स्फूर्तीसागरा !'
स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी सूर्य,धुरंधर,राजकारणी,निर्भीड पत्रकार,स्वराज्याचे पुरस्कर्ते, जहाल मतवादी असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आमच्या शाळेच्या सर्जनशील मुख्याध्यापिका सौ. शैलजा चौधरी बाई यांनी सहकारी शिक्षकांच्या मदतीने या उपक्रमांतर्गत इयत्तानिहाय विविध स्पर्धांचे नियोजन केले.
इ.१ली व २री च्या विद्यार्थ्यांसाठी अनुलेखन स्पर्धा ,
इ.३री व ४थी
विषय:लो.टिळकांचे चित्र रेखाटन
इयत्ता ५वी ते ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी 'लो.टिळकांचे जीवन व कार्य' या विषयावर ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेच्या सुरुवातीला देवश्री महाडिक(इ.६वी)हिने टिळकांविषयी काव्यगायन केले.
* इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी (मराठी)
*इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ( हिंदी ) ,
*इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी (इंग्रजी) या भाषांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.
ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मा.मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरीबाई यांच्या हस्ते ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात आले.
इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला .इ.१ली व २री च्या विद्यार्थ्यांनी अनुलेखनाची छायाचित्रे व इ.३री व ४थी च्या विद्यार्थ्यांनी स्वतः रेखाटलेली लो.टिळकांची चित्रे आपापल्या वर्ग शिक्षकांना पाठवली . यानंतर यातूनच शिक्षकांनी दोन उत्कृष्ट अनुलेखनाचे नमुने आणि दोन उत्कृष्ट चित्र रेखाटने यांची प्रातिनिधिक स्वरूपात निवड केली. .इयत्ता ५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण सन्मा.मुख्याध्यापिका सौ. चौधरी बाई,सहाय्यक शिक्षिका सौ. मुणगेकर बाई,श्री. पवार सर व श्री. नाठे सर यांनी केले.या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेतून प्रत्येक इयत्तानिहाय प्रथम दोन उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र पाठविण्यात आले . इ.५वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांच्याऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे संपूर्ण नियोजन श्री. पवार सर यांनी केले . अशाप्रकारे, ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्याचा आमच्या शाळेचा हा प्रयत्न यशस्वी झाला .सुंदर हस्ताक्षरात केलेली अनुलेखने, उत्तम पद्धतीने रेखाटलेली लो.टिळकांची चित्रे आणि विविध भाषांतून ऑनलाईन पद्धतीने लो. टिळकांविषयी मांडलेले विचार या माध्यमातून आमच्या शाळेत खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली .शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सौ. शैलजा चौधरी बाई यांचे बहुमूल्य मार्गदर्शन , शिक्षकांचे सुयोग्य नियोजन , विद्यार्थ्यांचे परिश्रम व पालकांचे सहकार्य यातून सदर उपक्रम यशस्वीरित्या पूर्णत्वास गेला .शालेय समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्री. शास्त्री सर , शालेय समिती सदस्य सन्माननीय श्री. इनामदार सर , शालेय समिती सदस्या सन्माननीय सौ. कुलकर्णी बाई यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या.अशा प्रकारे, लोकमान्य टिळकांचे स्मृतिशताब्दी वर्ष या ऑनलाईन शालेय उपक्रमाच्या माध्यमातून संस्मरणीय करण्यात आले .