स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथ.'रक्षाबंधन''३ ऑगस्ट २०२०
Source : Date :06-Aug-2020
राष्ट्रीय शिक्षण संस्था
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथ डोंबिवली पूर्व
सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2020
बंध हा प्रेमाचा,नाव जयाचे राखी
बांधते भाऊराया,आज तुझ्या हाती.
औक्षिते प्रेमाने ,उजळुनी दीपज्योती,
रक्षावे मज सदैव अन् अशीच फुलावी प्रीती.
रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निःस्वार्थ आणि पवित्र असते. रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीचे अमूल्य देणं आहे.
'शिक्षण' ही अखंड आणि अविरत चालणारी प्रक्रिया आहे.कोरोना महामारी च्या संकटापुढे सारे जग हतबल झाले असले तरीही शिक्षण हे त्यास अपवाद आहे. शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये नैतिक गुणांची जोपासना व्हावी यासाठी विविध सण,उत्सवाच्या माध्यमातून उपक्रमांचे आयोजन केले जाते. "शाळा बंद पण शिक्षण सुरू" या नवविध संकल्पनेतून इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पर्यावरणपूरक व टाकाऊ वस्तूंपासून राखी बनवणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.वर्गशिक्षकांच्या पूर्वसूचनेनुसार सर्व विद्यार्थ्यांनी घरी आपल्या कल्पनेतून विविध प्रकारच्या राख्या बनविल्या. लॉकडाऊन असल्यामुळे उपलब्ध साहित्याचा वापर करीत सर्जनशील राख्या बनविल्या व त्यांची छायाचित्रे आपापल्या वर्गशिक्षकांना पाठविली श्री मयूर राऊत सरांनी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या छायाचित्रांचे उत्कृष्टरित्या एकत्रीकरण केले.
दरवर्षी "कार्यानुभव"या विषयांतर्गत विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता,कल्पनाशक्ती,नाविन्यता या गुणांचा विकास व्हावा म्हणून अशा प्रकारे राख्या बनवून घेतल्या जातात.या वर्षी ऑनलाइन उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमधील संस्कारांना पोषक वातावरण निर्मिती करण्याचा शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरीबाई व समस्त शिक्षकवृंदानी पुरेपूर प्रयत्न केला. या उपक्रमात विद्यार्थीही तितक्याच उत्साहाने,आनंदाने सहभागी झाले.
विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या आपल्या भावंडांना बांधल्या तसेच कोरोनारुपी संकट काळात दिवस-रात्र झटणाऱ्या आपल्या जीवाची पर्वा न करणार्या डॉक्टर, परिचारिका, पोलिस, सफाईकामगार, आ.सेवक यांसारख्या कोविड योद्ध्यांना आमच्या विद्यार्थ्यांनी राख्या बांधल्या प्रेमाचे,कृतज्ञतेचे व गौरवाचे प्रतीक असलेली राखी बांधून त्यांच्या कार्याला सलाम केला.
शाळा समिती अध्यक्ष सन्माननीय श्री.शास्त्रीसर सदस्य सन्माननीय श्री. इनामदार सर व सदस्या सौ.कुलकर्णी बाई यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.