राष्ट्रीय शिक्षण संस्था
ईनरव्हिल क्लब ऑफ इंडिया आयोजित हिंदी वक्तृत्व स्पर्धेत कु. सर्वेश दाबके यांस प्रथम क्रमांक प्राप्त
१५ ऑगस्ट २०२० स्वातंत्र्य दिना निमित्त ईनरव्हिल क्लब ऑफ डोंबिवली आयोजित हिंदी वक्तृत्व स्पर्धेत
कु. सर्वेश चंद्रशेखर दाबके यास प्रथम क्रमांक मिळला.
यात इयत्ता ८ वी ते १० वी इयत्तेच्या गटात वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. यात डोंबिवलीतील ५ वी ते७ वी व ८ वी ते१० वी या गटात जवळ जवळ ४०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत स्वत:चा व्हिडिऒ तयार करुन पाठवयचा होता.
या ४०० विद्यार्थ्यामधून १० उत्कृष्ट विद्यार्थ्यांना निवडण्यात आले होते. यात कु. सर्वेश चंद्रशेखर दाबके यास प्रथम क्रमांक मिळला. त्याचा विषय होता “ भारत एक सांस्कृतिक धरोहर” त्यासाठी त्याला ईनरव्हिल क्लब तर्फे प्रमाणपत्र व चषक देऊन गौरवीण्यात आले.
या य़शाबद्द्ल शाळासमितीचे अध्यक्ष श्री शास्त्री सर व शाळेचे पदाधिकारी श्री उंटवाले सर यांनी त्याचे कौतुक केले.तसेच शाळेच्या मुख्याध्यपिका सौ. बोंडे बाई व पर्यवेक्षक सौ. विद्या कुलकर्णी व वर्ग शिक्षक सौ रानडे बाई व शिक्षक शिक्षकेतर वर्गाने व पालक वर्गाने त्याचे कौतुक केले.