" मातृदिनी करू आईचे औक्षण शुभेच्छापत्रातून करू व्यक्त ऋण "

Source :    Date :20-Aug-2020
- राष्ट्रीय शिक्षण संस्था- - - -
स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, दत्तनगर( प्राथमिक) डोंबिवली.
 
 मंगळवार दि.१८ ऑगस्ट  २०२०
 
 
   

" मातृदिनी करू आईचे औक्षण 
शुभेच्छापत्रातून करू व्यक्त ऋण "

'जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी।' या संस्कृत श्लोकात म्हटल्याप्रमाणे आई आणि जन्मभूमी स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहेत.
प्रत्येकाच्या आयुष्यातील आईचे स्थान हे अनन्यसाधारणच आहे आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीत मातेला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे.याच अनुषंगाने मातेच्या सन्मानार्थ दरवर्षी श्रावण महिन्यातील  'पिठोरी अमावास्या' हा  दिवस आपण 'मातृदिन' म्हणून साजरा करतो.आई बद्दल आदर ,प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवशी आई मुलांना वाण देते आणि मुलं आईचं औक्षण करतात आणि तिचे आशीर्वाद घेतात.

कोरोना महामारीच्या दहशतीमुळे सध्या शाळा बंद असल्या तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण आणि उपक्रमांच्या माध्यमातून शाळा व विद्यार्थी जोडले गेले आहेत. 
'मातृदिनानिमित्त'विद्यार्थ्यांना आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी आणि एक चांगला संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावा याकरिता  आमच्या शाळेच्या सन्मानीय मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरी बाई यांनी सहकारी शिक्षकांच्या मदतीने इयत्ता १ली ते ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धा व  उपक्रम यांचे आयोजन केले.
 इ.१ली ते ४थी भेटकार्ड तयार करणे वआई विषयी माहिती सांगणे.
 इ.५वी ते ७वी ➡ भेटकार्ड तयार करणे व आई विषयी कवितेचे गायन करणे.

इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आईला औक्षण करून व स्वतः तयार केलेली,सजावट केलेली भेटकार्ड देऊन आईबाबतचे ऋण व्यक्त केले.काही निवडक विद्यार्थ्यांनी आईविषयी माहिती सांगितली तर  काही विद्यार्थ्यांनी आई विषयक कवितांचे गायन केले.
इयत्ता १ली ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी व्हाट्स ॲपच्या माध्यमातून पाठवलेल्या भेटकार्डांच्या फोटोज मधून वर्गशिक्षकांनी प्रत्येक वर्गातील दोन उत्कृष्ट भेटकार्डांची निवड केली.मातृदिनानिमित्त विद्यार्थ्यांमार्फत प्राप्त झालेल्या फोटोज व व्हिडीओज इयत्ता पहिली ते चौथी चे एकत्रित संकलन सौ.भावना राठोड बाई यांनी केले व इयत्ता पाचवी ते सातवीच्या व्हिडिओ चे संकलन सौ. मुणगेकर  बाई यांनी केले.

आमच्या शाळेच्या सन्मा. मुख्याध्यापिका यांचे कुशल नेतृत्व,शिक्षकांचे सहकार्य आणि विद्यार्थी व पालक यांचा उत्साह यांतून सदर उपक्रम साकारला गेला.
शालेय समिती सन्मा.अध्यक्ष श्री शास्त्री सर व सन्मा. सदस्य श्री. इनामदार सर  सौ. कुलकर्णी बाई  यांनीही सदर उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या.
विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणारे आणि नकळतपणे विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे असे विविध उपक्रम शाळेमार्फत राबविण्यात येतात आणि यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचे शालेय जीवन समृद्ध  होत असते.