ईनरव्हिल क्लब आयोजित स्पर्धेत सर्वेश चंद्रशेखर दाबके याचा प्रथम क्रमांक
१५आँगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ईनरव्हील क्लब आँफ डोंबिवली ईस्ट यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या हिंदी वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावी च्या गटात आपल्या शाळेतील इयत्ता दहावी ब मधील कुमार सर्वेश चंद्रशेखर दाबके याचा प्रथम क्रमांक आलेला आहे.
त्याच्या वक्तृत्वाचा विषय होता " भारत एक सांस्कृतिक धरोहर "हिंदीतून त्याने हा आपला विषय मांडला.त्याला क्लबतर्फे प्रमाणपत्र व ट्राँफीदेऊन गौरवण्यात येणार आहे.
त्याबद्दल शाळेचे पदाधिकारी माननीय श्री शास्त्री सर ,माननीय श्री उंटवाले सर यानी त्याचे अभिनंदन केले आहे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका ,शाळेच्या पर्यवेक्षिका ,वर्गशिक्षिका,व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,पालक वर्ग यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे