गोविंदा रे गोपाळा दत्तनगरच्या बाळ गोपाळांची गोकुळाष्टमी

Source :    Date :12-Aug-2020
 
  गोविंदा रे गोपाळा   
दत्तनगरच्या बाळ गोपाळांची गोकुळाष्टमी 
 
 
 
 गोविंदा रे गोपाळा_1 

गोविंदा आला रे आला |

 गोकुळात आनंद झाला ||

श्रावण महिन्यातील एक महत्त्वाचा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी.भगवान श्रीकृष्णाने धर्माचे रक्षण करण्याकरिता ज्या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला तो दिवस म्हणजे श्री कृष्ण जन्माष्टमी. या जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीला सर्वत्र दहीहंडी म्हणजेच गोपाळकाला हा उत्सव साजरा केला जातो.दहीहंडी उत्सव म्हणजे जणू एकात्मतेचे प्रतीक असते.

            सध्या शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू आहे आणि शिक्षणाबरोबरच उपक्रमही सुरू आहेत. विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांचा विकास व्हावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.आमच्या शाळेतही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सन्मानीय मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरी यांनी सहकारी शिक्षकांच्या मदतीने इयत्तावार विविध ऑनलाईन उपक्रमांचे नियोजन केले.या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली- दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी दहीहंडीचे चित्र काढून रंगवणे, इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी दहीहंडीचे चित्र काढून सजावट करणे, तसेच इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालकृष्णाचे चित्र काढून कोलाज काम करणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

                 इयत्ता पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडीची आकर्षक रंगांनी रंगवलेली चित्रे व इयत्ता तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले साहित्य म्हणजेच डाळ, मणी,टिकल्या,लेस यांचा वापर करून सजवलेल्या दहीहंडीची चित्रे आपापल्या वर्गशिक्षकांना पाठवली.इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी बालकृष्णाचे चित्र काढून त्यावर सुंदर कोलाज काम करून चित्रे वर्गशिक्षकांना पाठवली.विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या चित्रांमधून इयता पहिली ते सातवीच्या वर्गशिक्षिकांनी दोन-दोन उत्कृष्ट चित्रांची निवड केली.

रंगीबेरंगी चित्रे,सौंदर्यदृष्टीतून केलेली सजावट व आकर्षक कोलाजकाम या उपक्रमातून गोपाळकाला साजरा करण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी वेशभूषेतून साकारलेले राधाकृष्ण अतिशय सुंदर दिसत होते.
 सौ.भावना राठोड बाईंश्री मयूर राऊत सर यांनी इयत्ता पहिली ते सातवीच्या चित्रांचे व्हिडिओ च्या रूपात एकत्रित संकलन केले.

     शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सौ.शैलजा चौधरी यांचे कुशल नेतृत्व,शिक्षकांचे उत्तम नियोजन,पालक व विद्यार्थी यांची मेहनत व उत्साह यामधूनच सदर उपक्रम साकारला गेला.

          शालेय समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्री.शास्त्री सर,शालेय समिती सदस्य सन्माननीय श्री. इनामदार सर,शालेय समिती सदस्या सन्माननीय सौ. कुलकर्णीबाई यांनी उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.