स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली पूर्व शाळेत योग उत्सव

Source :    Date :06-Feb-2020
  
Rathsaptami_1  
 
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली पूर्व शाळेत योग उत्सव
विविध व्यायाम प्रकार सादर:ओंकारसाधना,सूर्यनमस्कार,अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण,
                   रथसप्तमी निमित्त स्वामी विवेकानंद दत्तनगर प्राथमिक शाळेत सोमवार दि.१/२/२०२० शनिवार रोजी योग उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी सूर्यनमस्कारातील एक असलेला चंद्रनमस्कार,विविध व्यायाम प्रकारयोगासने यांचे सादरीकरण करण्यात आले.सूर्यदेवाला अर्ध्य दिल्यानंतर ओंकार प्रार्थना व अथर्वशीर्ष यांचे सामूहिक पठण झाले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी शंखनाद केला.मंत्रोच्चारांसह इयत्ता १ली ते ७वीच्या ४५० विद्यार्थ्यांनी व काही पालकांनीही सूर्यनमस्कार,योगासने केली.त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चारांसह चंद्रनमस्कार सादर केले.यानंतर ,बालवर्गाच्या मुलांनी योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले.
        शेवटी प्राथमिक विभागाच्या काही विद्यार्थ्यांनी चित्तथरारक योगासने सादर करून सगळ्यांना अचंबित केले.हा योग्य सोहळा पाहून प्रमुख पाहुणे व प्रसिद्ध योग शिक्षक श्री.विजय बने भारावून गेले.
                                 या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह श्री.प्रमोद उंटवाले शाळा समितीचे अध्यक्ष श्री.विद्याधर शास्त्री,माधवी कुलकर्णी,मुख्याध्यपिका सौ.शैलजा चौधरी,पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ.रश्मी पवार,कीर्ती मुरादे आदी मान्यवर उपस्थित होते.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.नयना पाटील व शाळेची विद्यार्थिनी कु.मृणाल पाटील यांनी केले.व आभार प्रदर्शन सौ.विद्या जोगळेकर यांनी केले.शाळेची माजी विद्यार्थिनी कु,आकांक्षा बावस्कर हिने कार्यक्रमासाठी बासरी वादन केले.

Rathsaptami_1  
Rathsaptami_2  
Rathsaptami_3  
Rathsaptami_1  
Rathsaptami_2  
Rathsaptami_3