स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली पूर्व शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Source :    Date :18-Feb-2020
 
shivjayanti...._2 &n
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली पूर्व शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी..
                    मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२० रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.वेगवेगळे गड,किल्ले बांधणे या इत्यादी इयत्ता ५वीच्या उपक्रमांतर्गत वर्गशिक्षक श्री.नाठे सरांनी इयत्ता ५ विच्या प्रत्येकी ८ विद्यार्थ्यांचे ८ गट पाडले होते.सर्वाना पूर्वसूचना देण्यात आल्या होत्या.त्यानुसार विद्यार्थ्यांनी दगड,माती गोळा केली होती.सकाळपासून विद्यार्थी गट निहाय किल्लेबांधणीच्या उपक्रमाला लागले होते.विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या किल्यांची नावे व माहितीचे तक्ते आणले होते.
 
shivjayanti...._1 &n
                   रायगड,प्रतापगड,सिंधुदुर्ग,शिवनेरी,पन्हाळा,कोंढाणा,अशा विविध किल्यांची रचना केली होती.मावळे,शिवरायांच्या प्रतिमा उभारल्या गेल्या होत्या.इयत्ता १ली ते ७वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी,शिक्षकांनी,मा.मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरी यांनी किल्यांच्या प्रदर्शनाला भेट दिली.व पाहणी केली.इयत्ता २रीचा कु,यश महाडिक या विद्यार्थ्यांने शिवाजी महाराज व अफजल खान वधाचा पोवाडा मोठ्या जोशात सादर केला.नंतर इयत्ता ५वी ते ७वीच्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची व्हिडिओ चित्रफीत दाखवण्यात आली.अशा प्रकारे शिवरायांचा जयघोष करीत शिवजयंती साजरी करण्यात आली.

shivjayanti...._1 &n 

shivjayanti...._1 &n
shivjayanti...._1 &n 

shivjayanti...._1 &n
shivjayanti...._2 &n 

shivjayanti...._1 &n 
 
''छत्रपती शिवाजी महाराज कि जय''