बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण...बालपणी होते सर्व सुखाचे धन...!!बालपणीच्या आठवणीत हरपते मन..येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण..बालदिनाच्या हार्दिक शुभे..च्छा
Source : Date :23-Nov-2020
बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण...
बालपणी होते सर्व सुखाचे धन...!!
बालपणीच्या आठवणीत हरपते मन..
येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण..
बालदिनाच्या हार्दिक शुभे..च्छा!!
भारतात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांच्या जन्मदिवशी म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. पंडित नेहरूंना मुलांविषयी वाटणार्या प्रेम व जिव्हाळ्याविषयी आदर व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे. बालकांनाही आयुष्याचा आनंद घेण्याचा, मौजमस्ती करण्याचा हक्क आहे आणि ह्या मुलांमधूनच देशाचे भावी सुशिक्षित आणि मनाने व शरीराने आरोग्यसंपन्न असे नागरिक तयार होणार आहेत. हा हक्क मिळालेल्या आपल्या नशीबवान मुलांनी आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्याबाबतची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. पालकांनी ही जाणीव आपल्या मुलांच्या मनात रुजवली तर भारताचे भावी नागरिक सुज्ञ आणि समजूतदार बनतीलच शिवाय कायमच वंचित आणि नकारात्मक जगणे वाट्याला आलेल्या एखाद्या दुर्दैवी बालकालाही आपल्या ह्या प्रयत्नांमुळे चांगले आयुष्य मिळू शकेल.
बालदिन साजरा करताना आपण अर्थातच चाचा नेहरूंचे त्यामागील विचार समजून घ्यायला हवेत. मुलामुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे तसेच त्यांना आपले आयुष्य फुलवण्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात भर घालण्याच्या समान संधीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत. बालदिनाच्या निमित्ताने आपणांपैकी प्रत्येकाला मुलांच्या कल्याणासाठी काहीतरी करण्याबाबतच्या आपल्या वचनबद्धतेची आठवण राहते.
भारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्यानंतरचे पहिले पंतप्रधान होते पंडित नेहरू. बालकांविषयी पंडित नेहरूंना वाटणार्या प्रेमाची आठवण म्हणून १४ नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस आपल्या देशात बालदिनाच्या रूपाने साजरा केला जातो.
आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथ डोंबिवली पूर्व.शाळेत सुद्धा १४ नोव्हेंबर बालदिनानिमित्त माननीय मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरी यांच्या संकल्पनेतून इयत्ता १ली ते ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाईन उपक्रमांचे आयोजन केले होते.
*इयत्ता १ ली ते ४थी :-*
पंडित जवाहरलाल नेहरूंची माहिती सांगणे.
*इयत्ता ५वी :-*
*विषय:* शुभेच्छा पत्र
गावी असणाऱ्या बहीण,भाऊ यांना पत्राद्वारे बालदिनाच्या शुभेच्छा देणे.
*इयत्ता ६वी/इयत्ता ७वी-:*
१) *विषय:* एकपात्री नाट्यछटा(मी नेहरू बोलतोय)_
२) *विषय:* आधारित स्वरचित कवितेचे गायन करणे._
सदर उपक्रमांत विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षकांचे व पालकांचे मार्गदर्शन घेऊन उत्तम रित्या सहभाग घेतला व सादरीकरण केले.शाळेच्या माननीय मुख्याध्यापिकासौ.शैलजा चौधरी शाळा समिती चे माननीय अध्यक्ष व सर्व माननीय सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.व शुभेच्छा दिल्या.