लक्षदीप हे उजळले घरी,दारी शोभली सडा रांगोळी, फुलवाती अंगणात सोनसकाळी,आली दिवाळी ,आली दिवाळी"

Source :    Date :19-Nov-2020
 
 
 
 
 आली दिवाळी ,आली दिवाळी
 
                                                                                            लक्षदीप हे उजळले घरी,
दारी शोभली सडा रांगोळी,
फुलवाती अंगणात सोनसकाळी,
आली दिवाळी ,आली दिवाळी"
राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर ,(प्राथमिक ),डोंबिवली शाळेत दिवाळीनिमित्त ऑनलाइन उपक्रमांचे आयोजन.
"सप्तरंगात न्हाऊन आली, आली माझ्या घरी ही दिवाळी!!"
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव प्रकाश हे तेज आणि प्रगतीचे प्रतिक आहे. दिवाळी हा प्रमुख हिंदू सण आहे .हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होत असतो.दीपावलीचे मूळ नाव 'यक्षरात्री' अशी नोंद हेमचंद्रा या प्राचीन ग्रंथात आढळून येते . तसेच नीलमत पूराण या ग्रंथात या सणाला 'दिपमाला' असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन यांनी नागानंद नाटकात या सणाला 'दिपप्रति पदुत्सव' असे नाव दिले आहे , तसेच काल्विवेक या ग्रंथात दिवाळीचा उल्लेख 'सुखरात्री' असा येतो व व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात 'सुख सुप्तिका' अशा असंख्य नावाने दिवाळी ओळखली जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या मध्यभागी अश्विन व कार्तिक या महिन्याच्या संधीकालात हा सण येतो अश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात.
विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाशाचा दिवा तेवत रहावा, सणांच्या पावित्र्याने व मांगल्याने त्यांचे भविष्य तेजोमय व्हावे, सणांच्या संस्कारांची ही शिदोरी सर्वांनी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अविरत प्रवाहीत करावी या उद्देशाने दत्तनगर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळी उपक्रमोत्सव साजरा केला ,यात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल अशाच उपक्रमांचे आयोजन करण्यात आले .
सध्याच्या वैश्विक संकटामुळे ऑनलाइन माध्यमांद्वारे शिक्षण व नवनवीन उपक्रम निरंतर सुरूच आहेत .या अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीत आनंद व उत्साह वाटेल अशा उपक्रमांचे मार्गदर्शन केले व सर्व सहकारी शिक्षकांनी त्या उपक्रमांचे आयोजन व नियोजन केले.
इयत्ता पहिली ते चौथी साठी
१) ठिपक्यांची रांगोळी काढणे व त्यात रंग भरणे.
२) मातीच्या पणत्यांना रंगवून सजावट करणे.
इयत्ता पाचवी सहावी साठी
१) आकाश कंदील तयार करणे
इयत्ता सातवी साठी
१) मातीच्या पणत्या रंगवून आकर्षक सजावट करणे्
 
वरील उपक्रमात इयत्ता पहिली ते सातवीच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला . अतिशय सुंदर ,मनमोहक आकाशकंदील, पणत्या ह्यांचे छान छान छायाचित्रे व्हाट्सअप च्या माध्यमातून वर्ग शिक्षकांकडे पाठवली. त्यातील उत्कृष्ट अशा कलाकृतींची वर्गशिक्षकांनी निवड केली .ह्या उपक्रमासाठी च्या सर्व छायाचित्रांचे एकत्रित संकलन व उपक्रमाचे लेखन सौ.भावना राठोड यांनी केले.
सदर उपक्रमासाठीशालेय समितीचे माननीय अध्यक्ष व माननीय सदस्यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले .
 
 
 

ReplyForward