स्वा.वि.वि.दत्तनगर प्राथ.डोंबिवली पूर्व.शाळेत भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टो.हा जन्म दिवस'वाचन प्रेरणा दिन 'म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.

Source :    Date :22-Oct-2020
  
vachan din_1  H
 
राष्ट्रीय शिक्षण संस्था 
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर (प्राथ.)डोंबिवली,पूर्व 
"डॉ.कलामांचे पुण्यस्मरण करूया
चला वाचूया,स्वतःला घडवूया"
स्वा.वि.वि.दत्तनगर प्राथ.डोंबिवली पूर्व.शाळेत भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टो.हा जन्म दिवस'वाचन प्रेरणा दिन 'म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
                  भारताचे मिसाईल मॅन, थोर अणुशास्त्रज्ञ, लेखक, भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस'वाचन प्रेरणा दिन 'म्हणून साजरा करण्यात येतो. विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांमध्ये वाचनाची आवड,ओढ व प्रेरणा निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीचा विकास व प्रसार, व्हावा, ज्ञानसंपन्न व माहिती समृद्ध समाज निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून या दिनाचे आयोजन केले जाते.डॉ. अब्दुल कलाम नेहमीच म्हणत, 'पुस्तकाच्या सहवासात ज्ञानाबरोबर नेहमीच मला आनंदही मिळाला आहे. ग्रंथ ही माझी सर्वांत मौल्यवान ठेव आहे.''युवक वाचतील तर देश वाचेल 'अशी त्यांना खात्री होती.'वाचाल तर वाचाल'असे आपण नेहमीच म्हणतो,पण त्या बोलण्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.विद्यार्थ्यांना वाचनाशी जोडून ठेवणे आणि तेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना,हे खरोखरच शिक्षणक्षेत्रासमोरचे मोठे आव्हानच आहे.परंतु आधुनिक संपर्कसाधनांच्या मदतीने हे आव्हान पेलणे सहज शक्य झाले आहे.
              'वाचन प्रेरणा दिना'चे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी याकरिता आमच्या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ. चौधरी यांनी सहकारी शिक्षकांच्या मदतीने इ. १ ली ते ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धा व उपक्रम यांचे आयोजन केले.
 *इ. १ ली ते ४ ती* 
पाठ्यपुस्तक वाचन स्पर्धा .
*इ. ५ वी ते ७ वी*
ऑनलाईन पुस्तक परीक्षण वाचन स्पर्धा.
                सदर उपक्रमात इ.१ली , २री विद्यार्थ्यांनी पाठवाचनाचे व्हिडिओज् व इ. ३ री ४थी च्या विद्यार्थ्यांनी कथावाचनाचे व्हिडिओज् तयार करून आपापल्या वर्गशिक्षकांना व्हाट्सअँप च्या माध्यमातून पाठवले त्यातून वर्गशिक्षकांनी प्रत्येक वर्गातून उत्कृष्ट व्हिडिओज् ची निवड केली.इ.५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपरीक्षण वाचन ही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आली.या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी पुस्तक परीक्षण लेखनाचे फोटोज विद्यार्थ्यांनी प्रथम शिक्षकांना पाठवले वर्गशिक्षकांनी प्रत्येक वर्गातील निवडक विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष ऑनलाईन स्पर्धेकरिता निवड केली.दि.१५ ऑक्टोबर सन्मा.मुख्याध्यापिका,‌इ.५वी ते ७वी चे शिक्षक यांच्या उपस्थितीत निवडलेल्या विद्यार्थ्यांची 'पुस्तक परीक्षण वाचन'ही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात संप्पन्न झाली. या स्पर्धेतून प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले. तसेच इ. ५ वी ते ७ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व वाचन प्रेरणा दिन 'या विषयावर माहिती सांगितली.‌तसेच १५ ऑक्टोबर हा दिवस ' Global hand wash day.म्हणून जगभर साजरा करण्यात येतो .स्वच्छतेचे महत्त्व विशेषतः हात धुण्याचे महत्त्व विद्यार्थी दशेतच मुलांना समजावे म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी 'Global hand wash day त्यांच्या घरी साजरा केला.
                      इ. ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे व हात धुण्याचे महत्त्व व्हिडिओद्वारे सांगितले. तसेच बहुतांश विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी हात धुत असतानाचे आपले छायाचित्र वर्गशिक्षकांना पाठवले अशा प्रकारे सन्मा. मुख्याध्यापिका सौ. चौधरी यांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे व सर्व शिक्षक, विद्यार्थी,पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी दोन्ही उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.शालेय समिती मा.अध्यक्ष व मा.सदस्य यांनी सदर उपक्रमांचे व उपक्रमांच्या कार्यवाहीचे कौतुक केले. व शुभेच्छा दिल्या.बालपणापासूनच वाचनतसेच स्वच्छता यांचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी असे उपक्रम नक्कीच पोषक ठरतील यात शंकाच नाही.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
१५ ऑक्टोबर हा दिवस ' Global hand wash day.म्हणून जगभर साजरा करण्यात येतो .स्वच्छतेचे महत्त्व विशेषतः हात धुण्याचे महत्त्व विद्यार्थी दशेतच मुलांना समजावे म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी 'Global hand wash day त्यांच्या घरी साजरा केला. 

vachan din_3  H
vachan din_2  H 

vachan din_1  H
vachan din_4  H
vachan din_3  H
vachan din_2  H
vachan din_1  H
vachan din_5  H
vachan din_4  H
vachan din_3  H
vachan din_2  H
vachan din_1  H