राष्ट्रीय शिक्षण संस्था,डोंबिवली स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेत 5 सप्टेंबर 2020 रोजी ऑनलाईन शिक्षक दिन उत्साहात साजरा
Source : Date :12-Oct-2020
राष्ट्रीय शिक्षण संस्था,डोंबिवली
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेत 5 सप्टेंबर 2020 रोजी ऑनलाईन शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
''भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने घडवितो तो शिक्षक''
(डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन)
५ सप्टेंबर हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस हा दिवस आपण दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो.या दिनानिमित्त या वर्षी आमच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे सर्व शिक्षकांसाठी ऑनलाइन या आधुनिक तंत्रज्ञानामार्फत उद्बोधन वर्ग घेण्यात आला.
शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरीयांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्व सहकारी शिक्षक यांनी पूर्वनियोजित केल्याप्रमाणे व त्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत सी.आर.सी.केंद्रातर्फे आलेल्या परिपत्रकाप्रमाणे“Thank a teacher' या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्याना वाव देण्यासाठी विविध कलात्मक वप्रेरणात्मक स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.इयत्ता १ली ते ७ वी - विद्यार्थ्यांनी आकर्षक शुभेच्यापत्र तयार करणे,त्यावर शिक्षकांप्रति आदर युक्त संदेश लेखन करणे.ह्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भेटकार्ड तयार करून त्यामध्ये लॉकडाउनच्या काळातील आपल्या शाळा व शिक्षकांविषयीच्या भावना व्यक्त केल्या व त्या व्हाट्सअप च्या माध्यमातून आपल्या गुरु पर्यन्त पाठविल्या.
इ.१ ली शाळा व शिक्षण या विषयावर आधारित घोषवाक्य तयार करणे.
इ.२ री-मनोगत- माझी शाळा.
इ.३ री,४थी-निबंध लेखन- माझे प्रेरक शिक्षक
इ.५ वी ते७ वी- निबंध लेखन- माझे आवडते शिक्षक
इ.५ वी ते ७ वी-कविता गायन- माझे शिक्षक पालक
पालकांचे मनोगत- विषय/माझे प्रेरक शिक्षक,जीवनातील शिक्षकांचे महत्व
लॉकडाउनच्या काळातही विद्यार्थ्यांनी शाळा व शिक्षण या विषयावर आधारित आकर्षिक घोषवाक्य तयार करून व्हाट्सअपच्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पाठवली.इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी माझी शाळा या विषयावर आपले मनोगत व्हाट्सअपच्या माध्यमातून व्यक्त केले.इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आपल्या भावना,आदर निबंध लेखन स्पधेतून व्यक्त केल्या. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी माझे शिक्षक या विषयावर कविता गायन करून त्यांचे चित्रणकरून व्हाट्सअपच्या माध्यमातून आपल्या शिक्षकांपर्यंत कविता पोहोचवल्या. शाळेच्या पालकांनी सुद्धा शिक्षक दिनानिमित्त माझे प्रेरक शिक्षक व जीवनातील शिक्षकांचे महत्व या विषयांवर आपले विचार मनोगत व्यक्त केले. त्याचे चित्रण करून आपल्या मनोगताचे चित्रीकरण व्हाट्सअपच्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पोहोचवले.
वरील सर्व उपक्रम व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून राबविण्यात आले ह्या कठीण काळात या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सर्व विद्यार्थी आणि पालकांनी सकारात्मकतेचे दर्शन घडवले या सहभागाबद्दल शाळा समिती पदाधिकारी यांच्याकडून विद्यार्थी व पालकांचे कौतुक केले.या उपक्रमाचे सादरीकरण पुढील प्रमाणे.