रोटरी क्लब ऑफ डोंबिवली आयोजित योग,व चित्रकला स्पर्धांमध्ये स्वामी विवेकांनद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली पूर्व शाळेतील विद्यार्थ्यांना घवघवीत यश...

Source :    Date :06-Jan-2020
 
''रोटरी क्लब ऑफ डोंबिवली आयोजित योगासने,व चित्रकला स्पर्धांमध्ये स्वामी विवेकांनद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली पूर्व शाळेतील विद्यार्थ्यांना घवघवीत यश.''
                       रोटरी क्लब ऑफ डोंबिवली आयोजित चित्रकला स्पर्धेचे आयोजन दि.४/०१/२०२० रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेत करण्यात आले.या स्पर्धेत इयत्ता १ली ते ७वीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.मनुष्य व प्राण्यांमधील सहसंबंध वाढीस लागावे,लळा लागावा,प्राणिमात्रांवर दया करणे,भूतदया ह्या मूल्यांची रुजवणूक व्हावी,या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी पाळीवप्राणीकुत्रा,मांजर,इत्यादी प्राण्यांची सुबक,सुरेख चित्रे काढली.प्रत्येक इयत्ता निहाय प्रथम तीन क्रमांक निवडण्यात आले.
या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे,श्री.सुधीरजी यमगरसर व सदस्य श्री.घनश्याम तापकीरसर उपस्थित होते. 
     प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यातआली.त्याच बरोबर कलाशिक्षक सौ.मुणगेकर,सौ.काळे,सौ.खाडे,शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.चौधरीबाई यांना देखील स्पर्धेसाठी घेतलेल्या बहुमूल्य सहकार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पवारसरांनी केले.विजेत्या स्पर्धकांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्याचे कार्य श्री.राऊतसर व श्री.नाठेसरांनी केले.
                     दि.५/०१/२०२० रोजी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली तर्फे रोटरीभवन डोंबिवली येथे घेण्यात आलेल्या''योगासन''स्पर्धेत १ली ते ७वी मधील एकूण सहभागी ९ विद्यार्थ्यांपैकी एकूण ६ विद्यार्थ्यांनी सुवर्ण,रौप्य,कांस्य पदके मिळवून यश संपादन केले.
rotary clab_1  
rotary clab_2   

rotary clab_1   
 
rotari compitaion _1 
rotari compitaion _2 
rotari compitaion _3 
rotari compitaion _4 
rotari compitaion _5 

rotari compitaion _7