राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली आयोजित
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सामूहिक ''सूर्यनमस्कार व योग'' प्रात्यक्षिकांचे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर शाळेच्या प्रांगणात उत्साहात सादरीकरण.
भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली सर्वोत्तम देणगी म्हणजे योग.आपले शरीर अन्नमय,प्राणमय,मनोमय,विज्ञानमय,व आनंदमय या पंचकोषानी बनलेले आहे.या पंचकोषाचा विकास करण्याचे सामर्थ्य योगसाधनेत आहे.पंचकोषाचा विकास साधण्यासाठी सूर्यनमस्कार हि उत्कृष्ट साधना आहे.विविध आसने व प्राणायाम यांचा सुंदर मिलाप म्हणजे सूर्यनमस्कार नियमितपणे सूर्यनमस्काराचा अभ्यास केल्याने उच्य रक्तदाब,हृदयविकार ,यांसारख्या असंख्य आजारांवर मात करता येते हे विज्ञानाने सिद्ध केले आहे.
अशा प्रकारे शारीरिक व मानसिक विकासातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून उद्याचा सक्षम नागरिक तयार करण्याचे काम गेली ५ दशके राष्ट्रीय शिक्षण संस्था करत आहे.याच सुवर्ण परंपरेचा एक भाग म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सामूहिक सूर्यनमस्कार सादरीकरण.
दि.२५ जानेवारी २०२० रोजी राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर प्राथमिक
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रामनगर प्राथमिक
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर/गणेशपथ प्राथमिक
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रामचंद्रनगर इंग्रजी /मराठी प्राथमिक
वरील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी दत्तनगर शाळेच्या मैदानात सामूहिक सूर्यनमस्कारांचे उत्तमरीत्या सादरीकरण केले.व दत्तनगर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मा.श्री.एकनाथ पवारसरांच्या मार्गदर्शनात सुंदर अशी योग प्रात्यक्षिके सादर केली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय डॉ.श्री.विवेकजी महाजन सर उपस्थित होते.तसेच राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह मा.श्री.प्रमोदजी उंटवालेसर मा.सदस्य श्री.शास्त्रीसर,रवींद्र जोशीसर,नरेंद्र दांडेकरसर,इनामदार सर,व सर्व शाळांचे मा.मुख्याध्यापक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.जगदाळेसर,श्री.दत्ताराम मोंडेसर यांनी केले,सर्व कार्यक्रमाचे नियोजन व पूर्वतयारी शाळांमधील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तमरीत्या केली होती.
सूर्यनमस्कार सादरीकरण
''नित्य करूया बारा सूर्यनमस्कार,तंदुरुस्त शरीरासाठी पहा चमत्कार''
स्थिती 1
स्थिती 2
स्थिती 3
स्थिती 4
स्थिती 5
स्थिती 6
स्थिती 7
स्थिती 8
स्थिती 9
स्थिती 10
योग प्रात्यक्षिके
''योग,सूर्यनमस्कार असे जेथे, आरोग्य वसे तेथे''