गुरुपौर्णिमा
गुरूबद्दलचा आदर व कृतज्ञता दाखविण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा,गुरूंचा आशिर्वाद मिळविणे व त्यांची कृपादृष्टी संपादन करणे व त्यांच्या साह्याने आपले ध्येय साध्यकरणे व ते साध्य करीत असताना मनात गुरूंचे स्मरण ठेवणे व त्याच बरोबर गुरूंचा वारसा पुढे चालविणे हा गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.गुरुपौर्णिमेचा हाच उद्देश डोळ्या समोर ठेऊन आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेत दि.१६/०७/२०१९ रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. ऋषीव्यासांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.वर्गावर्गातून विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचा इतिहास व महत्व याविषयी सांगण्यात आले.गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून इयत्ता १ली ते ७वी च्या वर्गांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या.विद्यार्थ्यांनी आवडीने सहभाग घेतला.
इयत्ता १ली २री : गुरुशिष्याच्या गोष्टी सांगणे.
इयत्ता ३री ४थी : गुरुशिष्याच्या पारंपरिक गोष्टी सांगणे.
इ. ५वी ते ७वी:गुरुशिष्याच्या आधुनिक गोष्टी सांगणे.