चला चला गाऊ चला...आनंदाचे गाणे!

Source :    Date :13-Oct-2019
हसत खेळत आनंददायी शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचा विकास करणे ह्या उद्धिष्टान्तर्गत आमची राष्ट्रीय शिक्षण संस्था विविध शालेय उपक्रमांचे आयोजन करत असते.


 
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये इयत्ता २ री साठी बागेस भेट ह्या उपक्रमाचे शुक्रवार दि . 30/07/2019 रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका सन्मा.सौ .चौधरीबाई यांच्या मार्गदर्शनाने आयोजन करण्यात आले.
 
इयत्ता २ री अ व ब वर्गाच्या शिक्षिका सौ .सैंदाणेबाई व सौ .नाईकबाई यांनी दत्तनगर परिसरातील सुवर्णा संतोष केणे उद्यानास भेट देण्यासाठी वर्गातील ८५ विद्यार्थ्यांना नेले.उद्यानातील हिरवीगार टवटवीत झाडे,रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली फुलझाडे व विविध औषधी वनस्पतीचे निरीक्षण करून विद्यार्थांनी मोकळ्या वातावरणात फिरण्याचा व खेळण्याचा आनंद लुटला.
 
डोळ्यांना आल्हाद देणाऱ्या त्या हिरवळीवर बसून मुलांनी खेळासोबतच खाउचाही आनंद लुटला.तब्बल एकतासाने आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असे गुणगुणत सर्व बाळ गोपाळ उत्साहाने आपल्या शाळेकडे रवाना झाले.