शहरातील जलसाठ्यास भेट....
जलसाठ्याचे महत्व, पाण्याचे वितरण,पाण्याचे नियोजन यांविषयी माहिती घेणे.
सोमवार दि.१६/०९/२०१९ रोजी सकाळी १०.१५ वाजता दत्तनगर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या नजीकच्या पाणीसाठ्याला भेट देण्याचे नियोजन केले होते.मधल्या सुट्टीनंतर सर्व विद्यार्थ्यांना घेऊन ३री चे वर्गशिक्षक सौ.राठोडबाई सौ.महाजनबाई श्री.राऊतसर दत्तनगर डोंबिवली (पूर्व)परिसरातील सुमारे१० दशलक्ष लिटर पाणी क्षमता
असलेल्या पाणीसाठ्याची माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन गेले.तेथे गेल्यानंतर मा.जलसाठा निरीक्षक श्री.वाळुंज यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.विद्यार्थ्यांनी काही शंकांचे निरसन करून घेतले.
उदा .पाणी कोणत्या धरणातून येते? पाणी कोणत्यावेळी कितीवेळा सोडतात? या टाकीतील पाणी कोणकोणात्या भागात वितरित करतात.?
सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षित उत्तरे मिळाल्यानंतर आंनदाने उत्साहाने विद्यार्थी पुन्हा वर्गात परतले.एका वेगळ्या ठिकाणी भेट दिल्यानंतर माहिती मिळाल्याचा आनंद प्रत्येक विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावर दिसत होता.