रेशमाच्या बंधनाने नातं अधिक खुललं.....बहिणीचे प्रेम भाऊरायाच्या मनगटावर सजलं

Source :    Date :26-Aug-2021
रेशमाच्या बंधनाने नातं अधिक खुललं.....
बहिणीचे प्रेम भाऊरायाच्या मनगटावर सजलं

R.B._1  H x W:  
          भारतीय संस्कृतीत अनेक सण व उत्सव साजरे केले जातात.यांतील प्रमुख सणांमध्ये रक्षाबंधन या सणाचा समावेश होतो. रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन! रक्षाबंधनाला राखी पौर्णिमा असेही म्हटले जाते. हा सण म्हणजे बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.या दिवशी बहीण आपल्या भावास ओवाळते व त्याच्या उजव्या मनगटावर राखी बांधते.त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हा सण आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करणारा सण आहे. हा सण भारताच्या अनेक प्रांतांत साजरा केला जातो. हा राजस्थानचा प्रमुख सण आहे या पौर्णिमेला 'पोवती पौर्णिमा' असेही म्हणतात.
       आपले सण व उत्सव समारंभ ,परंपरा विद्यार्थ्यांना माहित करून देण्यासाठी शाळेत विविध सणांचे औचित्य साधून वेगवेगळे उपक्रम घेतले जातात.रविवार दिनांक २२ ऑगस्ट २०२१ रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय ,प्राथमिक शाळेत Online पद्धतीने "रक्षाबंधन"हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘रक्षाबंधन’चे औचित्य साधून इयता १री ते इयता ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पर्यावरणपूरक राखी बनवणे’हा उपक्रम घेण्यात आला.विद्यार्थ्यांनी घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून फार सुंदर व आकर्षक अशा राख्या बनवल्या. याच राख्यांचा वापर करून रक्षाबंधन केले व त्याची क्षणचित्रे WhatsApp च्या माध्यमातून वर्गशिक्षकांना पाठवली.या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी स्वनिर्मितीचा आनंद अनुभवला .शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनित पांडुरंग वारके यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 

R.B._1  H x W:
R.B._2  H x W:
R.B._3  H x W:
R.B._4  H x W:
R.B._5  H x W:
R.B._6  H x W: