डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेवेकानंद विद्यामंदिर शाळांमध्ये हा दिवस उत्साहात साजरा होतो.दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात ‘समूहगीत’ स्पर्धांचे आयोजन केले जाते.ऑगस्ट महिना सुरु झाला की विद्यार्थ्याना वेध लागतात ते या समूहगीत स्पर्धेचे!!! सर्व वर्गांत देशभक्ती गीतांचे सूर कानी पडू लागतात.आपल्याच वर्गाच्या समूहगीताचे सादरीकरण कशाप्रकारे चांगले करता येईल यासाठी वर्गशिक्षक व विद्यार्थी प्रयत्न करत असतात.प्रत्यक्ष समूहगीत स्पर्धेच्या दिवशीचा विद्यार्थ्यांचा तो उत्साह काय वर्णावा?त्यादिवशीचे ते आनंदमयी वातावरण ,विद्यार्थ्यांचा जल्लोश ,त्यांच्यात लागलेली ती चढाओढ....आणि मग प्रत्यक्ष स्पर्धेच्या निकालानंतरचे विद्यार्थ्यांचे रुसवे-फुगवे !! या वर्षी कोरोना जागतिक संकटामुळे या सर्वाला मुकावे लागते कि काय ?असे वाटत असतानाच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती वानखेडे यांनी Online देशभक्ती गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला.Google meet वर मिटिंग घेऊन या संदर्भातील सर्व नियोजन त्यांनी केले.शुक्रवार दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजी इयत्ता २री ते इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी Online ‘देशभक्ती गीत गायन स्पर्धा’ घेण्यात आली.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.विद्यार्थ्यांनी आपल्या देशभक्ती गीतांचे चित्रीकरण करून वर्गशिक्षकांना Whatsapp च्या माध्यमातून सदर चित्रीकरण पाठवले.प्रतिकूल परिस्थीतीत ,उपलब्ध साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमप्रकारे गीतांचे सादरीकरण केले.मुख्याध्यापिका सौ.ज्योती वानखेडे यांनी सहभागी विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे कौतुक केले.