अरुणोदय शाळेत गोकुळाष्टमी निमित्त ‘चित्रकला स्पर्धा’

12 Aug 2020 22:01:58

अरुणोदय शाळेत गोकुळाष्टमी निमित्तचित्रकला स्पर्धा’


krishna_1  H x  

      भारत, संस्कृती.. सण-उत्सव.. चालीरीती यांचा देश.श्रावण महिन्याचे आगमन होते ते  अनेक उत्सवांचा नजराणासोबत घेऊनच.पौर्णिमेनंतर श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मोठ्या उत्साहात ‘गोकुळाष्टमी’ म्हणजे कृष्ण जन्म दिवस साजरा केला जातो.मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता तो दिवस श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीचा होता.म्हणून यादिवशी गोकुळाष्टमी’ म्हणजेच कृष्ण जन्म दिवस साजरा केला जातो.याच्याच दुसऱ्या दिवशी गोपाळकाला’ किंवा दहीहंडी’ मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

       दरवर्षी मोठ्या उत्साहात गोपाळकाला' साजरा केला जातो.पण सध्या कोरोनासारख्या जागतिक संकटामुळे पूर्ण जग थांबले आहे.शाळाही याला अपवाद नाही.जरी प्रत्यक्ष गोपाळकाला साजरा करू शकलो नसलो तरी या दिवसाचे औचित्य साधून आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय ,प्राथमिक शाळेत बुधवार दिनांक १२ ऑगस्ट २०२०  इयत्ता २री ते इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दहीहंडी उत्सव’ या विषयावर आधारित Online पद्धतीने ‘चित्रकला स्पर्धा’ घेण्यात आली.विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने दहीहंडीची चित्रे रेखाटून ती Whatsapp च्या माध्यमातून वर्गशिक्षकांना पाठवली.शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.ज्योती वानखेडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 
 
 
krishna_7  H x
krishna_6  H x
krishna_5  H x
krishna_4  H x
krishna_3  H x
krishna_2  H x
krishna_1  H x  

Powered By Sangraha 9.0