शालेय जीवनातील प्रत्येक क्षण जगा.......मा.श्री.कौस्तुभ लेले

07 Jan 2020 09:23:47

  शालेय जीवनातील प्रत्येक क्षण जगा.......मा.श्री.कौस्तुभ लेले   

      पारितोषिक......आपण मिळवलेल्या यशाबद्दल कोणीतरी केलेले कौतुक......आयुष्याच्या सुंदर इमारतीची पायाभरणी करण्यासाठी पाठीवर कोणीतरी दिलेली शाबासकीची थाप......जीवनरूपी अवकाशात मुक्तपणे विहार करता यावे यासाठी कोणीतरी पंखात भरलेले बळ.....शाळेतील विविध उपक्रमांची व स्पर्धांची विद्यार्थी ज्याप्रमाणे वाट पाहत असतात तशीच ते वाट पाहत असतात ती वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याची!!!

पारितोषिक_1  H  
      स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत सोमवार दिनांक ०६ जानेवारी २०२० रोजी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शाळेचे माजी विद्यार्थी मा.श्री. कौस्तुभ लेले , मा.श्री. अनिकेत घमंडी व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती वानखेडे उपस्थित होत्या. या पारितोषिक वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे माननीय श्री.कौस्तुभ लेले यांचा श्रीफळ भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.तसेच मा. श्री.अनिकेत घमंडी यांचाही सन्मान करण्यात आला. त्यानंतर वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात झाली.मा.श्री. कौस्तुभ लेले व अनिकेत घमंडी यांनी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला.गुरुपौर्णिमा ,बालदिन ,मातृदिन ,गणेशोत्सव ,दीपावली ,विविध नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथि , राष्ट्रीय सण ,दहिहंडी,नवरात्रोत्सव या दिवसांचे औचित्य साधुन वर्षभर घेण्यात आलेल्या स्मरणशक्ती, चित्रकला ,निबंध लेखन, पुस्तक वाचन , समूहगीत स्पर्धा , पणट्या बनवून सजवणे व आकाश कंदील बनवणे ,उतारा पाठांतर,मनाचे श्लोक पाठांतर अशा विविध स्पर्धा व वार्षिक क्रीडा स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला. आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय श्री.कौस्तुभ लेले यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. तसेच विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील आनंद पुरेपूर लुटा असे सांगितले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने 35 हजार 500 रूपयांचा आर्थिक निधी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती वानखेडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला"शाळेवर आमचं घरासाराखं प्रेम आहे आणि शाळेसाठी जे काही करतो ते त्या आपुलकीनेच..... "असे मा.श्री.कौस्तुभ लेले म्हणाले.

पारितोषिक_1  H
पारितोषिक_1  H
 
photo_1  H x W:
 
Powered By Sangraha 9.0