शालेय जीवनातील आनंदाचा क्षण ........सहल

25 Dec 2019 17:57:48

   शालेय जीवनातील आनंदाचा क्षण ........सहल 

PICNIC_1  H x W 
     शैक्षणिक सहल हा शालेय जीवनातील एक आनंदाचा भाग असतो. सहल म्हणजे मजा,सहल म्हणजे मोकळीक,सहल म्हणजे आनंद हे खरे असले तरी हा आनंद मिळवतानाही विद्यार्थी अनेक गोष्टी शिकत असतात.शाळेच्या भिंतीच्या बाहेरील जगातील अनेक गोष्टी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात भर घालतात. त्यामुळे त्यांना खूप आनंद होतो. एक वेगळ ज्ञान त्यांना मिळते.शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना चार भिंती बाहेरील शिक्षण मिळते. आणि त्यामुळे त्यांच्यात शिक्षणाची ओढ निर्माण होते. असे कितीतरी फायदे असतात शैक्षणिक सहलीचे…!!
  आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेची सन २०१९ - २० या शैक्षणिक वर्षाची सहल बुधवार दिनांक १८ डिसेंबर २०१९ रोजी हार्मोनी व्हिलेज रेसोर्ट ,बदलापूर इथे गेली होती.एकूण १८४ विद्यार्थी सहभागी झाले होते.सकाळी ठिक ८.०० वाजता शाळेतून ३ बस निघाल्यात व ठिक ९.३० वाजता हार्मोनी व्हिलेज रेसोर्ट ,बदलापूर इथे पोहोचल्यात. तिथे विद्यार्थ्यांनी बैलगाडी सवारी ,ट्रक्टर सवारी ,साहसी खेळ ,जादूचे खेळ यांचा मनोसोक्त आनंद घेतला. तेथील बागेत विद्यार्थी विविध खेळ खेळले. विद्यार्थ्यांना शेतीच्या विविध साधनांची ओळख करून देण्यात आली.विद्यार्थ्यांना बायोगैस सयंत्र दाखवण्यात आले व त्याची कार्यप्रणाली समजावून सांगण्यात आली.तसेच शेड नेटमध्ये कशाप्रकारे बिजोत्पादाने घेतली जातात हे समजावून सांगितले व प्रत्यक्ष शेड नेट विद्यार्थ्यांना दाखवले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्विमिंग पूलमध्ये स्विमिंगचा आस्वाद घेतला.संध्याकाळी ठिक ५.३० वाजता परतीच्या प्रवासास सुरवात झाली व संध्याकाळी ठिक ७.०० वाजता सर्व विद्यार्थी शाळेत पोहचले. 

PICNIC_1  H x W
PICNIC_27  H x
PICNIC_28  H x
PICNIC_23  H x
PICNIC_20  H x
PICNIC_16  H x
PICNIC_18  H x PICNIC_15  H x
PICNIC_17  H x
PICNIC_12  H x
PICNIC_9  H x W
PICNIC_6  H x W
PICNIC_8  H x W
PICNIC_5  H x W
PICNIC_4  H x W
PICNIC_3  H x W
PICNIC_11  H x
पिकनिक_1  H x W
 
Powered By Sangraha 9.0