जीवनातील अनमोल दिवस................... वाढदिवस
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला विशेष उत्साहाचा दिवस म्हणजे त्याचा वाढदिवस ! आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांबरोबरच शाळेतील कर्मचाऱ्याचेही वाढदिवस साजरे केले जातात . ज्या कर्मचाऱ्याचा वाढदिवस असेल त्या कर्मचाऱ्याला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वानखेडे बाईंच्या हस्ते गुलाब पुष्प व शाळेतच बनवलेले शुभेच्छा कार्ड दिले जाते. तसेच सदर कर्मचाऱ्याचे औक्षणही केले जाते.