विद्यार्थी प्रवेशोत्सव

19 Oct 2019 14:48:34
 
विद्यार्थी प्रवेशोत्सव  
  
             
          उन्हाळी सुट्यांचा आनंद उपभोगून शाळेत येणाऱ्या बालकांना शाळा हवीहवीशी वाटावी, यासाठी नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच १५ जून रोजी २०१९ रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला . शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्रेरणादायी असल्यास सुट्यानंतर बालकांना शाळेची ओढ लागेल,त्यांचे मन शाळेत रमेल,चैतन्य आणि उत्साहवर्धक प्रारंभ होऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांना गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळेल या उद्देशाने शासनाने हा उपक्रम राबवण्याचे ठरविले आहे. शाळा बालकांचे भावविश्व घडवते. सामाजिक विकासात आणि राष्ट्राच्या जडणघडणीत शाळेचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे हसत-खेळत शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने ‘विद्यार्थी प्रवेशोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
             आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय शाळेत दि. १५ जून २०१९ रोजी विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.या दिवशी संपूर्ण शाळा रांगोळी ,पताका,फुगे, तोरणे यांनी सजवली होती .येणाऱ्या प्रत्येक मुलाचे स्वागत शिक्षक करत होते .पुन्हा एकदा शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. शाळा समिती अध्यक्ष श्री.अरुण ऐतवडे सर ,शाळा समिती सदस्या सौ.वैभवी भार्गव ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वानखेडे बाई यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच वर्गावर्गात जाऊन विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. इयत्ता १ली च्या विद्यार्थ्यांना पेन्सिल व चॉकलेट वाटण्यात आली . या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटण्यात आला.
Powered By Sangraha 9.0