अरुणोदयच्या कु.मृणाली पाटीलचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

18 Oct 2019 20:28:13
अरुणोदयच्या कु.मृणाली  पाटीलचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश


 
         फेब्रुवारी २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय शाळेतील कु.मृणाली युवराज पाटील हिने २९६ पैकी २१८ गुण प्राप्त करत ठाणे जिल्हा गुणवत्ता यादीत १२२ वा क्रमांक मिळवला .या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळा समिती अध्यक्ष श्री.अरुण ऐतवडे सर ,शाळा समिती सदस्या सौ.वैभवी  भार्गव ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती वानखेडे ,सौ. सुप्रिया फडके यांनी कु.मृणाली पाटील हिचे गुलाबपुष्प देऊन कौतुक केले.
Powered By Sangraha 9.0