'नाट्यक्षेत्रातही उमटवला ठसा'
दि. २४ सप्टें. २०१९ रोजी श्रीकला संस्कार डोंबिवली ,आयोजित आंतरशालेय नाट्यस्पर्धेत शाळेने सहभाग घेतला होता . त्यामध्ये 'आकार' हि एकांकीका सादर करण्यात आली . ह्या एकांकिकेत मुलांनी उत्तम अभिनयाची चुणूक दाखवली . एकांकिकेचा विषय देखील मुलांच्या भावविश्वातला होता ." प्रत्येक मूल हे स्वतंत्र, स्वयंभू ,व स्वयंप्रज्ञ म्हणून जन्माला आलय त्याला त्याच्यातील सामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या नव्या शिक्षणपद्धतीची गरज आहे "हा महत्त्वाचा संदेश देण्यात आला होता . एकांकिकेचे दिग्दर्शन सौ. वैशाली निंबाळकर ,नेपथ्य श्री. राजू शिंपी ,यांनी केले . शाळेचे मुख्याध्यापक मा. पाटील सर यांनी मुलांना उत्तम प्रोत्साहन दिले.
"एकांकिकेला मिळालेली पारितोषिके"
१. उत्तेजनार्थ
२. एकांकिकेत विशेष लक्षवेधी भूमिका.
१) मनुताई -- रितिका पाटील १० अ
२) वक्रतुंड -- ध्रुव जोशी ९ब
३. सर्व एकांकाकिकेतून उत्कृष्ट कलाकार.
द्वितीय क्रमांक -- ध्रुव जोशी ९ब
४. उत्कृष्ट लेखन.
द्वितीय क्रमांक -- श्री.यातिन माझिरे
मुलांना त्यांच्यातील कलागुण ,अभिनय दाखवण्यासाठी उत्तम स्टेज मिळत आहे , म्हणून पालकांकडून उत्तम सहकार्य मिळत आहे.