आयुष्याच्या अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस ........ वाढदिवस

15 Oct 2019 20:13:54
आयुष्याच्या अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस ........ वाढदिवस

 
       प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला विशेष उत्साहाचा दिवस म्हणजे वाढदिवस! हा दिवस उजाडला की नवीन कपडे घालून थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादाने दिवस न्हाउन निघातो. मित्र-मैत्रीणी, नातेवाईकांच्या शुभेच्छा मनमोकळेपणाने मिळतात. त्यादिवशी शुभेच्छांचा नुसता वर्षाव होतो. घरातली आई, आजी, ताई औक्षण करुन सगळ्यांना नमस्कार करायला लावतात. काहीजण मंदिरात जाऊन देवाचा आशीर्वादही घेतात. आई घरात काहीतरी गोड्-धोड आवडीचे जेवण करते. ,केक कापला जातो. घरी मित्रमंडळी जमा होते .आणि मग वाढदिवस साजरा केला जातो. मंगल आणि पवित्र वातावरणाची निर्मिती करणारा हा क्षण !!!!
        प्रत्येक विद्यार्थ्यांच्या या सोनेरी क्षणाचे आपणही साक्षीदार व्हावे या हेतूने आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा कार्ड देऊन त्याला शुभेच्छा दिल्या जातात . ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस असेल त्या विद्यार्थ्याला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती वानखेडे बाई यांच्याहस्ते शुभेच्छा कार्ड दिले जाते . यातून त्या मुलांना मिळणार आनंद हा अवर्णनीय असतो. आपल्या शाळेकडून मिळलेल्या शुभेच्छा त्याला खूप मोलाच्या वाटतात .

 
Powered By Sangraha 9.0