दीप अमावस्या

12 Oct 2019 22:07:22

दीप अमावस्या

 

       आपल्या हिंदू  संस्कृतीत दिव्याला फार महत्व आहे. अज्ञान ,अंधकार व रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते. या दीपाच्या ज्योतीवरूनच प्राणालाही प्राणज्योत असे म्हटले जाते. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या. यादिवसानंतर श्रावण महिना सुरु होतो . विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्व समजावे म्हणून दिव्यांची आरास करून दीप अमावस्या साजरी करण्यात आली. 
       बुधवार दिनांक ३१ जुलै २०१९ रोजी आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत दीप अमावस्या साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध आकाराचे दिवे व विविध प्रकारची फुले आणली.फुलांची रांगोळी काढून स्वस्तिकच्या आकारात दिव्यांची मांडणी केली. सर्व विद्यार्थ्यांनी दिव्यांना नमस्कार करून प्रार्थना म्हटली दीप सूर्याग्निरूपस्तवम तेजस :तेज उत्तमम ,ग्रहाणं मत्क्रुतां पूजा सर्व कामप्रदो भवः व दिव्याचा आशीर्वाद घेतला . सर्व पालकांनीही या दिव्यांना वंदन केले व या उपक्रमाचे कौतुक केले.विद्यार्थ्यांना हिंदूंचे सणसमारंभ माहिती व्हावेत व संस्कृतीचे जतन करण्याची ईच्छा त्यांच्या मनात निर्माण व्हावी हा या उपक्रमा मागचा उद्देश .



Powered By Sangraha 9.0