ईनरव्हील क्लब डोंबिवली आयोजित कविता पाठांतर स्पर्धेत कु.सिद्धी कृष्णा तावडेला प्रथम क्रमांक

Source :    Date :21-Aug-2020
ईनरव्हील क्लब डोंबिवली आयोजित कविता पाठांतर स्पर्धेत कु.सिद्धी कृष्णा तावडेला प्रथम क्रमांक
 
मृणाल_2  H x W:
      दरवर्षी विविध शाळाबाह्य स्पर्धा होत असतात व विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करत असतात.परंतु यावर्षी ‘कोरोना’च्या जागतिक संकटामुळे या स्पर्धांवर मर्यादा पडल्या आहेत.तरीसुद्धा काही संस्था Online पद्धतीने स्पर्धांचे आयोजन करत आहेत .डोंबिवलीतील 'ईनरव्हील क्लब'ने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून'वक्तृत्व व कविता पाठांतर' या स्पर्धांचे आयोजन Online पद्धतीने केले होते.स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय, प्राथमिक शाळेच्या कु. सिद्धी कृष्णा तावडे हिने इयत्ता ५वी ते ७वीच्या गटात ‘पाठ्यपुस्तक कविता कंठस्थ’ या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
      शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.ज्योती वानखेडे ,तसेच शाळेचे सर्व शिक्षक यांनी कु. सिद्धी कृष्णा तावडे हिचे या यशाबद्दल अभिनंदन केले.