सर श्रावणाची देई चाहूल सणांची ,शुद्ध पंचमी दिनी करूया पूजा नागदेवतेची.
Source : Date :28-Jul-2020
सर श्रावणाची देई चाहूल सणांची ,
शुद्ध पंचमी दिनी करूया पूजा नागदेवतेची.
श्रावण महिना हा सर्वांचा आवडता महिना. या महिन्यातील प्रत्येक दिवस आनंदाचा व उत्साहाचा असतो. वातावरणात थंडावा आलेला असतो. निसर्गाच्या सृष्टी सौन्दर्याने पृथ्वीचे तारुण्य अधिकच खुलून दिसते. या महिन्यात अनेक सण येतात . श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावण महिन्यात अनेक सण आनंद व उत्साहपूर्वक साजरे केले जातात .या महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी होय. श्रावण शुद्ध पंचमीला हा सण येतो. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भाव समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे.नागपंचमीचा सण हा नागदेवतेबद्दल कृतज्ञता आदर व प्रेम व्यक्त करण्याचा दिवस.यादिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे.
आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेतही शनिवार दिनांक २५ जुलै २०२० रोजीकोरोना या जागतिक संकटकाळात "नागपंचमी" हा सण Online पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. विद्यार्थ्यांनी नागपंचमी सणाची क्षणचित्रे आपापल्या वर्गशिक्षकांना Whatsappच्या माध्यमातून पाठवली. नागपंचमीचे औचित्य साधून याच दिवशी इयत्ता दुसरी ते सातवीच्या वर्गांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा Online पद्धतीने घेण्यात आल्या. इयत्ता २री ते ४थीच्या विद्यार्थ्यांनी नागाची छान चित्र काढून रंगवली. इ.५वी ते इ.७ वीच्या विद्यार्थ्यांनी आंतरजालाच्या माध्यमातून सर्पांच्या विविध प्रजातींची सचित्र माहिती संकलित केली .सदर स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला .सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.ज्योती वानखेडे यांनी कौतुक केले.
इ.२ री :-नागाचे चित्र काढून रंगवणे
बक्षीस पात्र विद्यार्थी :-
इयत्ता दुसरी अ :- कु. तनिष सहदेव धुरी
इयत्ता दुसरी ब :- कु. जिगर हरिश मोरे
इ.३ री व इ.४थी :- नागाचे चित्र काढून माहिती लिहिणे.
बक्षीस पात्र विद्यार्थी :-
इयत्ता तिसरी अ :- कु. प्रज्वल सचिन बर्गे
इयत्ता तिसरी ब :- कु. स्वराज सचिन येळवे
इयत्ता चौथी अ :- कु.अंश राजेंद्र म्हात्रे
इयत्ता चौथी ब :- कु.जयदित्य दिगंबर जाधव
इ.५ वी ते इ.७ वी :- नागाचे वैज्ञानिक महत्व लिहिणे व नागाची सचित्र माहिती संग्रहित करणे