तंत्रज्ञानाची किमया न्यारी . दीप तेवले घरोघरी ......

Source :    Date :23-Jul-2020
 

deep_1  H x W:  
तंत्रज्ञानाची किमया न्यारी ,दीप तेवले घरोघरी ......

              दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. घरातील दिवे, समया, लामणदिवे ......या सर्वांना एकत्र करून, घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो. या दिवशी सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवले जातात. पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटून फुलांची आरास केली जाते.सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून दिवे प्रज्ज्वलित केले जातात. दिव्यांची हळद कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा केली जाते व नैवेद्य दाखवला जातो.तसेच तेजाची आराधनाही केली जाते.यादिवशी दीप पूजन केले जात असल्यामुळे या अमावस्येला अनन्य साधारण असे महत्त्व आहे.
          तिमिरातून तेजाकडे सा संदेश देणारा अशी दिव्याची ओळख आहे. आजच्या परिस्थितीत सगळ्यांनाच अशा प्रतिकात्मक दीप पूजनाची गरज आहे. जगावर कोरोना सारख्या महाभयंकर संकटाचे सावट आहे.दीप पूजनातून सर्वांना अंधकारमय परिस्थितीशी लढण्याचे बळ मिळो !!!!! अशी या दिव्यापाशी प्रार्थना करून दीप पूजन करण्यात आले.
          डोंबिवलीतील एक नामवंत व उपक्रमशील शिक्षण संस्था म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संस्था. या संस्थेच्या सर्व शाळांमध्ये दरवर्षी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात.यावर्षी जगावर कोरोना सारख्या महाभयंकर संकटाचे सावट आहे.त्यामुळे शाळा बंद आहेत;पण शिक्षण व उपक्रम मात्र सुरु आहेत.आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय ,प्राथमिक  शाळेत सोमवार दि.२० जुलै २०२० रोजी ऑनलाइन दीप अमावस्या साजरी करण्यात आली.तंत्रज्ञानाच्या मदतीने हा उपक्रम पार पडला.मा.मुख्याध्यापिका सौ.ज्योती वानखेडे यांनी प्रथम गूगल मीट चा वापर करून सर्वशिक्षकांची मीटिंग घेतली व कार्यक्रमाची रुपरेषा ठरवून दिली.त्यानंतर विद्यार्थ्यांना व्हाट्सएप्पवर  'दीप अमावस्या 'कशाप्रकारे साजरी करावी यासंबंधी सूचना देण्यात आल्या.विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी सुरेख रांगोळी रेखाटून फुलांची आरास केली व दीप पूजन केले.सदर उपक्रमाची क्षणचित्रे विद्यार्थ्यांनी व्हाट्सएप्पवर उत्स्फूर्तपणे वर्गशिक्षकांना पाठवली .उपक्रमात २५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांचा सहभाग पाहून मा.मुख्याध्यापिका सौ.ज्योती वानखेडे यांनी व सर्व शिक्षकांनी विद्यार्थी व पालक यांचे कौतुक केले.

deep_6  H x W:
deep_5  H x W:
deep_4  H x W:
deep_3  H x W:
deep_2  H x W:
deep_1  H x W: