अरुणोदय शाळेत साजरा झाला मराठी भाषा गौरव दिन

Source :    Date :28-Feb-2020
 
 अरुणोदय शाळेत साजरा झाला मराठी भाषा गौरव दिन
 
मराठी भाषा दिन _1 &n
रत्नजडित अभंग
ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे
सरस्वतीची पालखी....
        'मराठी भाषा गौरव दिन' हा जगभरातील मराठी भाषिकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,हि समस्त मराठीजनाची मागणी आहे. इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी,अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवांनी मराठीचा उल्लेख करता,करता ब्रम्हविद्या म्हंटले आहे,शब्दब्रह्मही म्हटले आहे. याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते. अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा सार्थ अभिमान वाटतो. कुसुमाग्रजांचा हा जन्म दिन मराठी भाषा दिन पाळला जातो.

marathi bhash din_5 
marathi bhash din_4 
marathi bhash din_3 
marathi bhash din_2  
        आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२० रोजी मोठ्यां उत्साही वातावरणात 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करण्यात करण्यात आला.प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सौ.वानखेडे यांनी कुसुमग्रजांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण केला व प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरवात झाली.विदयार्थ्यांना मराठी अभिमान गीत ऐकवण्यात आले.त्यानंतर प्रभात फेरी काढण्यात आली.विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केल्या होत्या.'मराठी दिन - चिरायू होवो' ,'मराठी दिनाचा विजय असो' ,'मी मराठी-आम्ही मराठी,या घोषणांनी परिसर दणाणुन गेला. ढोल ताशांच्या ठोक्यावर विद्यार्थ्यांनी लेझीम प्रात्यक्षिके केली. त्यानंतर शाळेत आल्यावर पुढील पुढील कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे कुसुमग्रजांच्या कवितांचे वाचन तसेच गायन केले,मराठी भाषेचा इतिहास तसेच महत्व विशद केले.ज्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले त्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वानखेड़े यांनी बक्षिस देऊन कौतुक केले.अतिशय आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात मराठी भाषा गौरव दिन पार पडला.