डोंबिवलीतील एक नामांकित शिक्षण संस्था म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संस्था! या संस्थेमार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात.या संस्थेच्या सर्वशाळा स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या नावाने डोंबिवलीमध्ये सुपरिचित आहेत. समाजाचं आपण काही देणं लागतो ,समाजात काही चांगले विचार पोहोचले पाहिजेत या विचाराने स्वामी विवेकानंदाच्या जन्मदिनांकाला धरुन दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. आपल्या समाजात अनेक ध्येयवेडी माणसे असतात, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून राष्ट्रप्रेमाने प्रेरित माणसं समाजासाठी झटत असतात. विविध क्षेत्रातील अशी ही माणसं प्रसिद्धी अथवा मान-मरातब यापासून दूर असतात. अशी माणसे म्हणजे अस्सल पाणीदार मोती!!त्यांच्या कार्याची नोंद घ्यावी व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी या भूमिकेतुन दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण संस्थे तर्फे स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन केले जाते. दरवर्षी 12 जानेवारी म्हणजेच स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी संस्थेतर्फे एखाद्या नामवंत व्यक्तिमत्त्वाला स्वामी विवेकानंद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
१.विद्यावाचस्पति पंडित शंकर अभ्यंकर सन १९९८[सांस्कृतिक व्याख्याते ]
२. कै.राम शेवाळकर सन १९९९ [साहित्यिक व व्याख्याते ]
३. कै.नानाजी देशमुख सन २००० [समाजसेवक ]
४.. पद्मभूषण डॉ.श्री.जयंत नारळीकर सन २००१ [खगोलशास्त्र ]
५. कै.वंदनीय उषाताई चाटी सन २००२ [संचालिका ,राष्ट्र सेविका समिती ]
६.डॉ. श्री.रघुनाथ माशेलकर सन २००३ [शास्त्रज्ञ ]
७.डॉ. श्री. माधवराव चितळे सन २००४[जलसंधारणतज्ज्ञ]
८.श्री.जे.एफ.रिबेरो सन २००५ [माजी पोलीस महासंचालक ]
९.कै. वामनराव प्रभुदेसाई सन २००६ [उद्योजग,संस्थापक ,पितांबरी]
१०.कै.शंकर नारायण तथा शन्ना नवरे सन २००७ [ज्येष्ठ साहित्यिक]
११.श्री. गिरीश प्रभुणे सन २००८ [ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते]
१२. कै.मोहन आपटे सन २००९ [विज्ञान लेखक ]
१३.श्री.दाजी पणशीकर सन २०१० [महाभारताचे गाढे अभ्यासक ]
१४.श्री.श्रीधर फडके सन २०११ [गायक ,संगीतकार ]
१५.कै. विनय आपटे सन २०१२ [ज्येष्ठ दिग्दर्शक]
१६.श्री.पवन भोईर सन २०१३[जिम्नॅस्टिकपटू ]
१७.डॉ. सौ. रेणू दांडेकर सन २०१४ [शिक्षणतज्ज्ञ ]
१८.कै.योगाचार्य श्रीकृष्ण वासुदेव व्यवहारे सन २०१५ [योग विभाग प्रमुख ,घंटाळी मित्रमंडळ ,ठाणे]
१९.श्री.दिलीप कुलकर्णी सन २०१६ [पर्यावरणतज्ज्ञ]
२०.श्री.चंद्रशेखर टिळक सन २०१७ [अर्थतज्ज्ञ]
२१.श्री.अविनाश धर्माधिकारी सन २०१८ [माजी आय.ए.एस.अधिकारी ]
२२..श्रीमती इंदुमती ताई काटदरे सन २०१९ [शिक्षणतज्ज्ञ ]
सन २०२० या वर्षाच्या स्वामी विवेकानंद पुरस्काराचे मानकरी ठरलेत ते मा.श्री.प्रवीणजी दाभोळकर.रविवार दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगरच्या भव्य प्रांगणात हा पुरस्कार संस्था अध्यक्ष मा.श्री.सुभाषजी वाघमारे यांच्या हस्ते मा.श्री.प्रवीणजी दाभोळकर यांना प्रदान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर कार्यवाह मा.श्री.दीपकजी कुलकर्णी तसेच उपाध्यक्ष मा.श्री.विलासजी जोशी उपस्थित होते.मा.सौ.दीपाली काळे यांनी मा.श्री.प्रवीणजी दाभोळकर यांची मुलाखत घेतली.या मुलाखतीतून मा.श्री.प्रवीणजी दाभोळकर यांच्या सेवाभावी वृत्तीचे सर्वांनाच दर्शन झाले.मुलाखतीअंती मा.श्री.प्रवीणजी दाभोळकर यांनी राष्ट्रीय शिक्षण संस्था ,उपस्थित सर्व डोंबिवलीकर यांचे आभार मानले.
या पुरस्कार प्रदान समारंभाच्या आधी म्हणजेच दिनांक १०.०१.२०२० व ११.०१.२०२० या दोन दिवशी स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला पार पडली. शुक्रवार दिनांक १०.०१.२०२० रोजी या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले ते सन्माननीय श्री.सुनीलजी विश्वनाथ देवधर यांनी .त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता “पूर्वांचलातील बदल”.