अरुणोदय शाळेत क्रीडास्पर्धा संपन्न

Source :    Date :06-Dec-2019

   
sports_1  H x W

       बदलत्या जीवनशैलीमुळे शारीरिक कष्ट अतिशय कमी झाले आहेतसध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे युग असून या युगात आपल्या देशाला प्रगतीपथावर घेवून जाण्यासाठी शारीरिक   मानसिक दृष्ट्या सक्षम नागरिक तयार करणे गरजेचे आहेमनुष्य बुद्धिवान प्राणी असून मनुष्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर आकाशाला गवसणी घातली आहे. मात्र हे सर्व साध्य करीत असतांना मैदानी खेळ ,व्यायाम ,शारीरिक कष्ट माणूस विसरत चालला आहे. हे  आरोग्यासाठी अतिशय घातक असून त्यामुळे आज प्रत्येक वयोगटातील व्यक्ति ताणतणावाखाली दिसतो. त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होऊन वेळप्रसंगी विविध आजारांना बळी पडावे लागत आहे. हे सर्व टाळण्यासाठी मैदानी खेळाशिवाय पर्याय नाही.मैदानी खेळामुळे शारीरिक क्षमतेबरोबर व्यक्तीतील खिलाडु वृत्ती, एकाग्रता, सहनशीलता, आत्मविश्वास, नेतृत्व गुण आदी महत्वाच्या गुणांचा विकास होतो. त्याचा फायदा त्या व्यक्तीबरोबरच देशाच्या विकासासाठीही होतो. त्यामुळे जीवनात खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे.
      आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळॆत दिनांक०४ डिसेंबर २०१९, ०५ डिसेंबर २०१९, ०७ डिसेंबर २०१९ ०९ डिसेंबर २०१९ या कालावधीत शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन भागशाळा मैदान तसेच शालेय मैदान या ठिकाणी करण्यात आले होते.या स्पर्धेचे उदघाटन शाळासमिती सदस्य मा. श्री. वसंतराव देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. मा.श्री. वसंतराव देशपांडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती राजेंद्र वानखेडे ,सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खालील स्पर्धा घेण्यात आल्या.
इयत्ता १ ली :
१. २५ मीटर धावणे
२. बटाटा शर्यत
३. बेडूक उड्या
इयत्ता २ री :
१. २५ मीटर धावणे
२. बुक बॅलन्स
३. बटाटा शर्यत
इयत्ता ३ री व ४ थी :
वैयक्तिक : १.  ५० मीटर धावणे
                  २.पोती शर्यत
 सांघिक : लंगडी
इयत्ता ५ वी व ६ वी :
वैयक्तिक : १. १०० मीटर धावणे
                  २.चेंडू फेक
सांघिक : लंगडी
इयत्ता ७ वी :
वैयक्तिक : १. १०० मीटर धावणे
                  २.चेंडू फेक
सांघिक : कबड्डी

sports_4  H x W
sports_3  H x W
sports_2  H x W
sports_1  H x W 
sports_5  H x W
sports_4  H x W
sports_3  H x W
sports_1  H x W
sports_3  H x W