आंतरशालेय कबड्डी स्पर्धेतील विजय

Source :    Date :02-Dec-2019
आंतरशालेय कबड्डी स्पर्धेतील विजय
दि. २३ व २४ नोव्हेंबर रोजी अश्वमेध स्पोर्ट्स फाऊंडेशन व वॉरियर्स स्पोर्ट्स क्लब डोंबिवली, यांच्यातर्फे आंतरशालेय कबड्डी आयोजित करण्यात आल्या होत्या .ह्या स्पर्धेत शाळेकडून मुलांचा आणि मुलींचा दोन्ही संघ सहभागी झाले होते. अतिशय चुरशीच्या सामन्यामध्ये विद्यार्थांनी आपली उत्कृष्ट चढाई ,व उत्तम पकड़ करून चषकावर आपले नाव नोंदवले ह्या सामन्यांमध्ये मुलीचा संघ उपविजयी ,तर मुलांचा संघ विजयी झाला.
 
sports_1  H x W
 
या स्पर्धेत विद्यार्थाना पुढील वैयक्तिक बक्षिसे प्राप्त झाली.
१ जान्हवी पाटील -----उत्कृष्ट चढाईपटू
२ रिया भोईर ----------उत्कृष्ट पकडपटू
३ श्रीराज भडसाळे -----सर्वोत्तम खेळाडू
४ प्रणय झगडे ---------उत्कृष्ट पकडपटू

sports_1  H x W 
ह्या स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर यांनी प्रोत्साहन दिले . तर शाळेचे सहशिक्षक श्री. पवार सर यांनी विशेष मार्गदर्शन केले.