अरुणोदयच्या विद्यार्थ्यांनी केला संकल्प ....
विज्ञानाची धरू कास, करू देशाचा विकास
देशात सर्वत्र तंत्रज्ञान आणि आधुनिक साधनांची वाढती व्याप्ती लक्षात घेता अधिकाधिक शोध व नवनवीन संशोधन झाले पाहिजे. या करिता अधिकाधिक शास्त्रज्ञ निर्माण होण्याची गरज आहे. विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहकार्याने दरवर्षी आयोजित केले जाणारे विज्ञान प्रदर्शन अत्यंत उपयुक्त असून विज्ञान संशोधन भविष्यसाठीच नव्हे तर आत्ताच्या काळाची गरज बनली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी जणू संपूर्ण मानव जातीच्या विकासाचा विडाच उचलाय . विज्ञान विषयाची जागृती शालेय स्तरापासून व्हावी व विज्ञानाची आवड व गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जात असते. विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळून त्याच्या विचार शक्तीचा विकास होतो. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात प्रत्येकाने अद्ययावत राहणे गरजेचे आहे. विज्ञानाची दृष्टी विद्यार्थ्यांनी शालेय वयापासून स्वीकारली पाहिजे . विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे हि काळाची गरज असून याकरिता विज्ञान प्रदर्शने महत्वाची असतात.
आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०१९ रोजी शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता ३ री ४ थीचे ३३ व इयत्ता ५ वी ते ७ वी चे ६१ असे एकूण ९४ प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती वानखेडे बाई यांनी शाळासमिती सदस्या सौ . वैभवी भार्गव, शाळा समिती सदस्य श्री. रविंद्र जोशी , श्री.वसंतराव देशपांडे व परीक्षक यांचे भेटवस्तू व हिंदू संस्कृतीचे प्रतीक तुळसीचे रोप देऊन स्वागत केले. प्रदर्शनाचे उदघाटन शाळासमिती सदस्या सौ . वैभवी भार्गव यांनी केले . यावेळी शाळा समिती सदस्य श्री. रविंद्र जोशी ,श्री.वसंतराव देशपांडे ,परीक्षक व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती वानखेडे उपस्थित होत्या . मा . सौ. वानखेडे बाई यांनी या विज्ञान प्रदर्शन मागचा हेतू स्पष्ट केला व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मा . सौ. वैभवी भार्गव यांनी आजच्या युगात विज्ञानाचे महत्व काय आहे हे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.
या दोन्ही गटातून विजेत्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
बक्षीसपात्र प्रकल्प :-
इयत्ता ३ री ४ थी :
१. वायुप्रदूषण
सहभागी विद्यार्थी : १. कु. जयदित्य दिगंबर जाधव
२.कु.आर्यन गणेश कारंडे
२. पाण्यावर चालणारी इलेक्ट्रिक बोट
सहभागी विद्यार्थी : १. कु. सिद्धी सागर उत्तेकर
२.कु.चैतन्य सचिन घोंगडे
३.कु.धीरज वसंत पाटील
इयत्ता ५ वी ते ७ वी :
१.माती रहित शेती
सहभागी विद्यार्थी : १. कु. मृणाली युवराज पाटील
२.कु.वंशिका अविनाश उतेकर
२.जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी
सहभागी विद्यार्थी : १. कु. कुणाल सुभाष निवाते
२.कु.सुरज किरण ढोलम
३. ओला दुष्काळ
सहभागी विद्यार्थी : १. कु. गार्गी विनायक कोलांगडे
२.कु.प्राची रत्नकांत पेडणेकर
या सर्व बक्षिसपात्र विद्यार्थ्यांचे सर्वांनी कौतुक केले. या विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण श्री. कैलास आसाराम माळी सह शिक्षक स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर प्राथमिक ,श्री. दत्ताराम रामजी मोंडे सह शिक्षक स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर प्राथमिक ,सौ.अंकिता खैरनार सहशिक्षिका स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गणेशपथ प्राथमिक यांनी केले. अशाप्रकारे अतिशय आनंदी वातावरणात विज्ञान प्रदर्शन पार पडले.