स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत स्वच्छता ही सेवा उपक्रम
दिनांक 02 ऑक्टोबर रोजी म.गांधी जयंती निमित्त 'स्वच्छता ही सेवा" हा उपक्रम स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात राबवण्यात आला.प्रथम म.गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.तदनंतर प्रभातफेरी काढण्यात आली."धरु स्वच्छतेची कास,करू देशाचा विकास"या घोषणा आजुबाजुच्या परिसरात घूमू लागल्या.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यपिका सौ.वानखेड़े मॅडम ,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक व शाळेचे विद्यार्थी हजर होते.