योग असे जिथे आरोग्य वसे तिथे
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
शुक्रवार दिनांक २१ जून २०१९ रोजी आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत सकाळच्या प्रसन्न वातावरणात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात करण्यात आला. शाळेतील शिक्षक श्री. शांताराम अहिरे यांनी यॊग,योगदिनाचे महत्व,योगाचे प्रकार,योगाभ्यासाचे महत्त्व विद्यार्थी व पालक यांना पटवून दिले.
यादिवशी शिक्षक,विद्यार्थी व पालक यांनी श्री. अहिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने व प्राणायम प्रकार केले. हा संपूर्ण कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती वानखेडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी एकूण ७९२ विद्यार्थी उपस्थित होते. गुरुवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
जगभरातील अखिल मानवजातीच्या निरोगी शरीरासाठी, संस्कारक्षम व संतुलित मनासाठी आणि सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी भारताने अखिल विश्वाला दिलेली ही अमृतमय पर्वणीच म्हणावी लागेल.