विद्यार्थ्यांनी घेतली प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

Source :    Date :11-Oct-2019
 
                             विद्यार्थ्यांनी घेतली प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ
 
 
                 
           स्वामी विवेकानंद विद्यामन्दिर अरुणोदय प्राथमिक शाळेत आज दिनांक 11 ऑक्टोबर 2019 रोजी इयत्ता 3 री व 4 थी साठी आकाशकंदिल बनवणे व इयत्ता 5वी ते 7वी साठी पणती बनवणे व रंगवणे हा उपक्रम घेण्यात आला.इयत्ता 3री व 4थीच्या सुमारे 200 व 5 वी ते 7 वीच्या सुमारे 300 विद्यार्थ्यानी या उपक्रमात भाग घेतला. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक आकाशकंदील व पणत्या बनवल्या.या उपक्रमात विद्यार्थी आपले देहभान विसरून सामील झाले होते. या चिमुकल्यांच्या हातातून तयार झालेली ही कलाकृती पाहून शाळेच्या मुख्याध्यपिका सौ . ज्योती वानखेडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .व दिवाळी दिवशी हे आकाशकंदील व पणत्या वापरण्यास सांगितल्या .
               विद्यार्थ्याना आपली संस्कृति व परंपरा यांची ओळख व्हावी व ही संस्कृति व परंपरा पुढच्या पिढीकडे संक्रमित व्हावी हा या उपक्रमा मागचा उद्देश.या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती वानखेड़े मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली.