शिक्षक दिन - 2019 उत्साहात संपन्न

Source :    Date :13-Sep-2019

वैदिक काळापासूनच शिक्षकांना गुरुचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून, त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. शिक्षक वृंद हा राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा पायाभूत घटक आहे.

या सद्विचारांचे महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवली, दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी शिक्षकांचा गौरव करीत असते. यंदा 5 सप्टेंबर ला गणेशोत्सवाच्या सुट्टीचे वातावरण असल्याने हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम भाद्रपद शुद्ध 14 शके 1941 शुक्रवार, दिनांक 13 सप्टेंबर रोजी शुभमंगल कार्यालय , डोम्बिवली पूर्व येथे उत्साहात संपन्न झाला.

शिक्षक दिनाच्या या कार्यक्रमाची सुरुवात संस्था मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

त्यानंतर पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षक वृंदाने सुरेल व सुरेख ईश वंदना सादर केली.

संस्थेचे कार्यवाह माननीय श्री दीपक कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यात त्यांनी आपल्या शिक्षकांनी अद्ययावत रहाणे ही आजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महत्त्वाचे आहे. शिक्षक चांगल्या आचारांचे प्रदान करणारा असावा . शिक्षण संस्था म्हणजे जेथे चांगले शिक्षक विद्यार्थी घडवित असतात ती संस्था.

कुठलीही संस्था कार्यरत राहण्यासाठी कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे असते. हे लक्षात घेऊनच यावर्षी संस्थेच्या उज्ज्वल वाटचालीसाठी ज्या कार्यकर्त्यांनी आपले अमूल्य योगदान दिले आहे अशा ज्येष्ठ सदस्याचे संबंधी कृतज्ञता व्यक्त करण्याचे औचित्य साधले.

यात खालील पाच जेष्ठ संस्था सदस्यांचा प्रतिनिधीक स्वरूपात गौरव करण्यात आला.

१) श्री. श्रीकांत शंकर जोशी यांचा गौरव संस्था अध्यक्ष डॉक्टर श्री. सुभाष वाघमारे यांचे हस्ते करण्यात आला.

२) श्री वसंतराव जोशी यांना श्री प्रमोद उंटवाले यांचे हस्ते गौरवण्यात आले.

३) श्री अच्युतराव खरे यांना श्री. शशिकांत कर्डेकर यांनी गौरविले.

४) श्री सुरेशजी फाटक यांचा गौरव श्री. विद्याधर शास्त्री यांनी केला.


संस्थेच्या रात्र महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी विद्यावाचस्पती म्हणजेच पीएचडी ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.

यामध्ये डॉ श्री सुरेश मनोहर चंद्रात्रे यांचा गौरव श्री मोरेश्वर कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आला.

डॉ. प्रीती कांतिलाल सोनी यांना डॉ . सौ. सरोज कुलकर्णी यांचे हस्ते गौरवण्यात आले.

डॉ श्री सुमंत एकनाथ औताडे यांचा सत्कार श्री प्रदीपजी पराडकर यांचे हस्ते करण्यात आला.

डॉ श्री सूर्यकांत शेळके यांना श्री. इनामदार सर यांनी गौरविले.

तसेच महाविद्यालयातील एक शिपाई कर्मचारी श्री अनिल गायकवाड यांनी एम ए पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचाही या प्रसंगी मा. वैद्य डॉ विनयजी वेलणकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय शिक्षण संस्थेत 25 वर्षांपेक्षा जास्त सेवा केल्या बद्दल शिक्षिका सौ लता गौतम मोरे यांचा गौरव संस्था कार्यकारिणी सदस्य डॉ श्री शिरीष फडके यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यंदा हा पुरस्कार राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या शिक्षिका सौ. भूमिका प्रविण महाजन यांना संस्थाध्यक्ष डॉ श्री सुभाष वाघमारे यांनी प्रदान केला. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

संस्थाध्यक्षांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले व शिक्षकांना यथोचित मार्गदर्शनही केले.

शेवटी संस्था सदस्य श्री सतीश महानूर यांनी आभार व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थेच्या शिक्षिका सौ. केळकर यांची कन्या कुमारी शमिका राजीव केळकर हिच्या सुरेल गायनाने कार्यक्रमाला रंगत आणली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ श्री श्रीनिवास आठल्ये यांनी ओघवत्या भाषेत केले.

संपूर्ण वंदेमातरम् ने शिक्षक दिनचा कार्यक्रम पुर्ण झाला.