@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@ राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या विविध शाळा

राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या विविध शाळा

गोपाळ नगर
1मे 1968 मध्ये संस्थेच्या स्थापनेबरोबरच डोंबिवली पूर्वेकडे गोपाळनगर भागात बारा मे 1968 रोजी, श्रीयुत मा. गो. तथा बाबासाहेब मोकाशी यांच्या घरकुल या निवासस्थानी त्यांच्या गच्चीवर पाच वर्ग खोल्या बांधून या शाळेची सुरुवात झाली.
1969 मध्ये या शाळेला शासकीय मान्यता मिळाली.
1976 पासून येथे माध्यमिक शाळा सुरू झाली व 1978 मध्ये या शाळेला अनुदान प्राप्त झाले.
1983 पासून प्राथमिक शाळेला अनुदान मिळाले
सध्या ही शाळा नेहरू मैदानासमोरील विक्रमादित्य भवन येथे भरत आहे.

गणेशपथ
गणेशपथ जवळील मिडल क्लास गव्हर्मेंट सर्व्हंट्स ची वस्ती असलेल्या भागात शाळा बांधण्यासाठी 99 वर्षांच्या कराराने एक प्लॉट संस्थेला मिळाला. याबरोबरच येथे सौ कर्वे यांच्या घरी सुरू असलेली शिशुविहार ही शाळा हे संचालनासाठी सुपूर्द करण्यात आली.
सध्या गोपाळ नगर ची शाळा ही याच इमारतीत भरवण्यात येते.

रामनगर
डोंबिवली पूर्वेकडील रामनगर विभागात संध्याताई रानडे यांच्या घरात एक शाळा सुरू होती. हे नावही स्वामी विवेकानंद विद्यामंदिर असेच होते. कैलासवासी मामा फाटक यांच्या प्रयत्नाने रामनगर येथील राणी ट्रस्टच्या इमारतीत 1968 पासून ही शाळा भरू लागली होती. दादाजी दादाजी आणि कंपनीचे मालक श्री रामकृष्ण राणे त्यांच्या मालकीचा पंधरा हजार रुपयात घेऊन तेथे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ची “ गुरु गोविंद सिंह भवन” ही वास्तू उभारण्यात आली. ही जमीन राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पूर्ण मालकीची आहे.
प्रारंभी येथे पूर्व प्राथमिक विभाग सुरू करण्यात आला तेथे ई. 7 वी पर्यंतचे वर्ग भरवण्यात येतात.

दत्तनगर
1967 पासून दतनगर भागातील सामाजिक कार्यकर्त्या सौ सुधाताई साठे त्यांच्या राहत्या घरी शाळा चालू होती. 1969 सालीही शाळा राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या परिवारातील एक घटक बनली. श्री. मुंशी आणि कै. मोकाशी प्रयत्नामुळे दत्तनगर भागात एक सरकारी प्लॉट शाळेसाठी मिळाला निधी उपलब्ध झाल्यावर संस्थेने शाळेचे बांधकाम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले. दत्तनगर च्या या शाळेसाठी कै. सुधाताई साठे यांनी अविरत परिश्रम केले आहेत.

जून 1976 पासून येथे माध्यमिक विभागाची शाळा सुरू झाली तिला 1978 ला अनुदान मिळू लागले. येथील प्राथमिक शाळेला 1983मध्ये अनुदान प्राप्त होऊ लागले. संस्थेच्या सर्व शाळांतून शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या गुणवत्ता यादीत येण्याचा येण्याचा मान
दत्तनगर शाळेकडे जातो.

विष्णूनगर
डोंबिवलीच्या पश्चिम भागात तीस वर्षापूर्वी वस्ती वाढू लागल्यावर तेथे शाळेची गरज भासू लागली. विष्णू नगर भागात विद्याप्रेमी नागरिक श्री. अंतरकर यांच्या राहत्या घरी शिशू विकास मंदिर नावाने शाळा सुरू होती. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री. मोकाशी यांनी त्यांचं हे काम पाहिलं व ही शाळा, 1970 मध्ये राष्ट्रीय शिक्षण संस्थेमध्ये सामावून घेतली. नामवंत उद्योजक श्रीयुत नाख्ये यांच्या गाळ्यात ही सुरुवातीला वर्ग भरवले जात होते श्री वाणी व श्रीयुत मोकाशी यांच्या प्रयत्नाने कै. नवरे यांच्या मालकीचा एक प्लॉट ती मध्ये राष्ट्रीय शिक्षण संस्थेस विकत मिळाला त्या जागेवर आज विद्यामंदिर विष्णुनगर ची राणाप्रताप भवन ही भव्य वास्तू उभी आहे.

1975 ते 1990 या कालखंडात टप्प्याटप्प्याने या शाळेचे बांधकाम पूर्ण करण्यात आले याच वस्तू तळमजल्यावर डॉक्टर हेडगेवार हे सभागृह ही आहे या शाळेची शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे ची पहिली तुकडी 1983 मध्ये पाठविण्यात आली. 1995 मध्ये कु. अपर्णा दिलीप गोळे ही शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या यादीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली त्याच वेळी कुमार अनिष खांडेकर हा गुणवत्ता यादीत दुसरा आला आणि या दोघांसह इतर पाच विद्यार्थी त्यावेळी गुणवत्ता यादीत आले होते. आगामी काळात संस्था तंत्रज्ञानकेंद्रीत विकासावर भर देणार आहे. शाळांचे वर्ग डिजिटल करण्यावर भर देणार आहे.

अरुणोदय
डोंबिवलीच्या पश्चिम भागातील जय हिंद कॉलनी जवळील अरुणोदय या भागात एक शिक्षण प्रेमी नागरिक श्री सुभाष रेंघे यांच्या निवासस्थानी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय शाळेची स्थापना 1970 मध्ये झाली. डोंबिवली पश्चिम या भागातील राष्ट्रीय शिक्षण संस्थेची ही दुसरी शाळा सुरुवातीला वर्ग श्रीयुत रेघे यांच्या घरीच भरत.
या काळात संस्थेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला त्यावेळी या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते कै दिवाकर करमरकर श्रीयुत हळदीकर प्राध्यापक पेंडसे व श्री रेंघे यांनी कर्ज काढून शाळेच्या आर्थिक गरजा पुऱ्या केल्या. कालांतराने अरुणोदय सोसायटीत शाळेसाठी एक प्लॉट मिळाला. त्या प्लॉटवर टप्प्याटप्प्याने या इमारतीचे बांधकाम करण्यात आले राजा संभाजी भवन असे त्याचे नामकरण करण्यात आले 1989 मध्ये माध्यमिक शाळा 3 तत्त्वावर सुरू झाली 1992 पासून अंशतः आणि 96 97 पासून शंभर टक्के अनुदान या शाळेला मिळू लागले.
2016 मध्ये या शाळेची वास्तु पाडून तिथे नवीन वास्तूत सध्या शाळा सुरू आहे. तेथील परीसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आदिवासी आश्रम शाळा : चिंध्याची वाडी
दिनांक 1 फेब्रुवारी 1999 रोजी मौजे पुगा येथील समाज मंदिरात कै. रामभाऊ ताम्हणे यांच्या हस्ते आदिवासी आश्रम शाळेचे उद्घाटन झाले. 2000 ते 2001 व या वर्षात पहिली ते चौथी चे 125 विद्यार्थी येथे दाखल झाले. परंतु फुगाळे येथे शाळेसाठी जागा मिळेना तेथील सर्व जमीन वनखात्याची होती. म्हणून संस्थेने स्थानांतरण करण्याचे ठरविले. 2003 मध्ये संस्थेच्या प्रयत्नांना यश आले.

चिंध्याची वाडी येथे श्रीमती धरसोड यांचेकडून दोन एकर जागा खरेदी करण्यात आली. तसेच तेथील संस्थेचे एक हितचिंतक श्री. महादू पारधी यांनी त्यांची एक एकर जागा 2004 मध्ये संस्थेला बक्षीस म्हणून दिली. ऑक्टोबर 2004 मध्ये चिंध्याची वाडी येथे शाळांचे वर्ग भरविण्यासाठी दहा वर्ग खोल्या डोंबिवली चे बांधकाम कंत्राटदार श्रीयुत रमेश चौधरी यांचेकडून बांधून घेतल्या.

येथे मुलींसाठी वेगळे वस्तीगृह व अधीक्षक नेमण्यात आले आहेत. मुलांच्या वस्तीगृहाची वेगळी सोय केलेली आहे. मुलांसाठी वेगळे क्रीडाप्रकार उपलब्ध आहेत. पाण्यासाठी विहीर बांधण्यात आली आहे. येथील भूभागातील जलस्तर कमी असल्यामुळे उन्हाळ्यात विहिरीला पाणी विषय कमी मिळते. बोर मारून दुसरीकडे पाणी उपलब्ध आहे का याचा तपास करण्यात आला परंतु त्याचा उपयोग झाला नाही. मुलांसाठी स्वतंत्र भोजनगृह आहे.

समाजातील अनेक दानशूर संस्थांकडून आश्रम शाळेसाठी सोलर दिवे, मोठ्या आकाराचे प्रेशर कुकर तसेच इतर साधन सामग्री भेट म्हणून मिळाली आहे. सध्या तिथे जवळ साडेचारशे मुलं-मुली पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेत आहेत. 2009/2010 या वर्षी दहावीच्या पहिली तुकडीचे यश 100% होते.

स्वामी विवेकानंद कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय
राष्ट्रीय शिक्षण संस्थेने, डोंबिवली परिसरातील शिक्षण प्रेमी, परंतु कुटुंबासाठी अर्थार्जन करण्याची गरज असलेल्या विद्यार्थी वर्गासाठी एक रात्र महाविद्यालय सुरू करण्याचे ठरविले. दिनांक 9 /7 /98 पासून महाविद्यालय सुरू करण्याची अनुमती मिळाली प्रत्यक्षात शैक्षणिक वर्ष 98 99 पासून हे महाविद्यालय सुरू झाले. सुरुवातीला प्राध्यापक नंद प्राचार्य म्हणून काम पाहत होते. विद्यार्थी वर्गाचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.

सुरुवातीला राणा प्रताप भवन येथे भरत असलेले कॉलेजचे वर्ग, नंतर दत्तनगर येथे सुरू करण्यात आले.

कॉलेजला NAAC चे B हे प्रमाण मिळाले आहे. कॉलेजला ISI चा दर्जा प्राप्त झाला आहे. सध्या कॉलेज मध्ये कला विभागात प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांचे प्रत्येकी एक वर्ग सुरु आहेत.

वाणिज्य शाखेत वरील प्रमाणे वर्ग असुनही प्रथम व द्वितीय वर्षांचे, एक एक विनाअनुदानित वर्ग सुरु आहेत.

कॉलेजची लायब्ररी विविध विषयाच्या पुस्तकांनी अतिशय परिपूर्ण आहे. तसेच अनेक संदर्भग्रंथ ही तेथे उपलब्ध आहेत.

कॉलेजच्या बहुतेक अध्यापक वर्ग पीएचडी धारक आहेत.